Thursday, July 2, 2026
Homeमहाराष्ट्रकर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकर्‍यांना प्राधान्याने पीक कर्ज – दादा भुसे

कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकर्‍यांना प्राधान्याने पीक कर्ज – दादा भुसे

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेत काही शेतकर्‍यांना अडचणींमुळे लाभ झाला नाही. अशा शेतकर्‍यांना प्राधान्याने पीक कर्ज देणार असल्याचं राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या खरीप पीक आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेत काही शेतकर्‍यांना अडचणींमुळे लाभ झाला नाही अशा शेतकर्‍यांना प्राधान्याने पीक कर्ज देणार आहे. काही ठिकाणी 50 टक्के पर्यंत तर काही ठिकाणी 10-15 टक्के पीक कर्ज वाटप झाल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतून 30 लाख शेतकर्‍यांना लाभ मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात पात्र झालेल्या दोन लाखांच्या आतील हे शेतकरी आहेत. 19 लाख शेतकर्‍यांचे 12 हजार कोटी रुपये खात्यावर वर्ग झालेले आहेत. 11 लाख शेतकर्‍यांचे साडेनऊ हजार कोटी रुपये लॉक डाऊन मुळे थांबलेल्या होते. मात्र लॉक डाऊन थांबल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल. या शेतकर्‍यांचे व्याजासकट पैसे सरकार भरणार आहे. त्यांना पिक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे भुसे यांनी सांगितलं.

दरम्यान, चौथ्या टप्प्यानंतर लॉकडाऊन हटवला जाईल की वाढवला जाईल. याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, अशा परिस्थितीत कृषी विभागाला मात्र लॉक डाउन नसल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. कृषी विभागानं यापूर्वीच शेतकर्‍यांना सूट दिलेली आहे. येणार्‍या काळात शेतकर्‍यांना आणखी सहकार्य करणार. एखादा शेतकरी शहरातून ग्रामीण भागात पेरण्यासाठी जाणार असेल तर त्यांना क्वारंटाईन भाग वगळून सवलत द्यावी, असं भुसे यांनी म्हटलं. त्याचबरोबर टोळधाड नष्ट करण्यासाठी एक-दोन दिवसात ड्रोनचा वापर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यात मुबलक बियाण आणि खात उपलब्ध आहे. युरिया 50 हजार मेट्रिक टन बफार स्टॉक केला जाणार आहे. त्यामुळं बियाणे आणि खताचे अडचण येणार नसल्याचं सांगितलं. त्याचबरोबर शेतकर्‍यांच्या बांधावर खत आणि बियाणे दिले जात आहे. त्यामुळे एका गोणी मागे 10 ते 30 रुपये शेतकर्‍यांचा फायदा होतोय तर कापूस, सोयाबीन, तूर, कांदा, मका, ज्वारी खरेदीचा आढावा घेतला. 15 जून पर्यंत खरेदी पूर्ण करायची सूचना केली असून उद्दिष्ट सफल होईल, असंही त्यांनी म्हटलं. बोगस बियाणे प्रकरणी काही ठिकाणी शेतकर्‍यांची फसवणूक होते मात्र कुणी बोगस बियाणे विक्री करत असेल. वाढीव दराने बियाणे आणि खताची विक्री करत असेल. तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिला.

तर टोळधाडवर कीटकनाशक फवारणीचे काम प्रगतिपथावर आहे. फायर ब्रिगेडचे बंबने सुद्धा फवारणीसाठी वापरण्यात आले. ट्रॅक्टरचे फवारणीचे ब्लोअर वापर करतोय. पन्नास टक्क्यापेक्षा जास्त कीटकांचा नाश केला आहे. शेतकर्‍यांना कृषी विभागाच्या वतीने कीटकनाशके मोफत देण्याचा प्रयत्न आहे. तर ड्रोनच्या माध्यमातून किटकनाशकांची फवारणी करता येईल का यासंदर्भात नियोजन सुरू आहे. एक दोन दिवसात तोही प्रयोग सुरू करत असल्याचं कृषिमंत्री भुसे यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

Shalarth ID Scam : पगार लाटणारे ११०० शिक्षकही पोलिसांच्या रडारवर; तब्बल...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या नाशिक विभागीय शिक्षण कार्यालयातील (Education Office) बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात (Shalarth ID Scam) विशेष तपास पथकाने...