Thursday, May 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजManikrao Kokate : "कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड..."; कोकाटेंचे विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

Manikrao Kokate : “कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड…”; कोकाटेंचे विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

मुंबई | Mumbai 

राज्याचे कृषिमंत्री आणि नाशिकच्या सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे त्यांच्या विधानामुळे सातत्याने चर्चेत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) सिन्नर तालुका दौऱ्यात (Sinnar Taluka Tour) नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असे विधान केले होते. यावरून शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. यानंतर आता पुन्हा एकदा कोकाटे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलतांना कृषीमंत्री पदाबाबत एक विधान केले आहे. या विधानांमुळे ते पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसत आहेत.

- Advertisement -

काल शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) अ.भा.बळीराजा संघटना भारततर्फे एमजीएमच्या आर्यभट्ट सभागृहात शेतकऱ्यांच्या गुणवंत पाल्यांच्या सत्कार समारंभात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलतांना ते म्हणाले की,”कृषिमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असून, अजित पवार यांनी मला हे खाते जाणीवपूर्वक दिले आहे, असे म्हटले. तसेच यामध्ये चांगले काम करता येऊ शकते.हे उदाहरणही आपल्याला महाराष्ट्रामध्ये द्यायचे असून, आजही देशात महाराष्ट्र (Maharashtra) सर्वच बाबतीत अव्वल”, असल्याचे मंत्री कोकाटे यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान हे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करत आहेत. दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने (Central Government) १७ पिकांसाठी सुमारे दीडपट हमीभाव जाहीर केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्नशील आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीविषयक शिक्षण घेऊन, शेती आधारित व्यवसायात करिअर करावे”, असा सल्लाही यावेळी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिला.

कृषीमंत्र्यांचे ‘त्या’ विधानावर स्पष्टीकरण

दोन दिवसांपूर्वी कोकाटे यांनी सिन्नर तालुक्यातील पाहणी दौऱ्यावेळी “हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असे विधान केले होते. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले होते. यावर स्पष्टीकरण देतांना कोकाटे यांनी “मी असं काही बोललोच नव्हतो”,असे म्हटले.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : एटीएसची झाडाझडती! राज्यात नाशिकसह चाळीस ठिकाणी छापे;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik पाकिस्तानातील (Pakistan) लाहोरचा (Lahor) कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी याच्या सिंडिकेटशी संबंधित संशयास्पद संपर्कांवर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने बुधवारी पहाटेपासून राज्यासह नाशिक...