Friday, October 23, 2026
Homeराजकीयरामदास कदमांवर भाजपचे प्रवीण दरेकर कडाडले; म्हणाले, "महायुतीत राहून सहकाऱ्यांना…"

रामदास कदमांवर भाजपचे प्रवीण दरेकर कडाडले; म्हणाले, “महायुतीत राहून सहकाऱ्यांना…”

मुंबई । Mumbai

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून पेटलेला राजकीय वाद आता शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात थेट आमनेसामने आला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी मनोज जरांगे यांच्या आरोपांना उत्तर देताना भाजपवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याने भाजप आक्रमक झाली आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम यांना अत्यंत कडक शब्दांत धारेवर धरले.

- Advertisement -

पत्रकार परिषदेत बोलताना प्रवीण दरेकर यांनी रामदास कदमांच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला. ते म्हणाले, “महायुतीत राहून सहकाऱ्यांना शिव्या द्यायच्या किंवा दोष द्यायचा, हे आमच्या संस्कृतीत बसत नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांवर जेव्हा आरोप झाले आणि कटकारस्थाने झाली, तेव्हा जरांगेंना पडद्याआड राहून ताकद देणारे नेमके कोण होते? फडणवीसांना बदनाम करायला कोण-कोण पाठीशी होते, या सर्वांचा शोध यथावकाश नक्कीच होईल.”

रामदास कदमांवर जोरदार हल्लाबोल करत दरेकर पुढे म्हणाले, “एखाद्या ज्येष्ठ आणि जबाबदार नेत्याने आपल्या नेतृत्वाला खूश करण्यासाठी, आपल्या मुलाचे मंत्रिपद सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा आणखी कोणते प्रमोशन मिळवण्यासाठी खुशाल बोलावे, आमची काही हरकत नाही. परंतु, जर तुम्ही भारतीय जनता पक्षाला विनाकारण दोष देणार असाल, तर ते आम्ही मुळीच खपवून घेणार नाही. तुम्ही जसे आक्रमक बोलता, तसे आम्हालाही वागता आणि बोलता येते.”

दरेकर यांनी रामदास कदमांना सवाल केला की, कोणत्या भाजप नेत्याने एकनाथ शिंदेंना संपवण्याचा विडा उचलला आहे, हे स्पष्ट करावे. ते म्हणाले, “आम्ही एकाच महायुतीच्या परिवारात राहतो, त्यामुळे सभ्यपणा आणि सुसंस्कृतपणा सर्वांनीच जपला पाहिजे. एकनाथ शिंदेंवर आरोप झाल्यावर तुम्ही बोलणे स्वाभाविक आहे, आम्हीही प्रकरणाच्या चौकशीचे समर्थन करतो. पण जेव्हा देवेंद्रजींवर आरोप झाले, तेव्हा त्याचे काय? त्या सर्व कटकारस्थानांचीही चौकशी झालीच पाहिजे,” असा थेट इशारा दरेकरांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

रील स्टार निघाले लुटारू! ९ हजारांची रोकड, सोन्याचे दागिने आणि दुचाकी...

0
पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) सोशल मीडियावर रील बनवून प्रसिद्धी मिळविणारेच लुटारू निघाल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डी तालुक्यातील शेकटे फाट्याजवळ घडल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. पाथर्डी-कोरडगाव रस्त्यावर...