Sunday, October 27, 2024
HomeनगरAssembly Election : जिल्ह्यात चार दिवसात 569 इच्छुकांनी नेले 1 हजारांहून अधिक...

Assembly Election : जिल्ह्यात चार दिवसात 569 इच्छुकांनी नेले 1 हजारांहून अधिक अर्ज

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

विधानसभा निवडणुकीसाठी चालू आठवड्यातील चार दिवसांचा अवघी संपला आहे. या चार दिवसात जिल्ह्यातील 12 मतदारसंघातून 1 हजार 13 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज विकत नेले आहेत.

- Advertisement -

यातील 53 जणांचे 69 दाखल झाले आहेत. यात शुक्रवारी 20 जणांचे 27 दाखल झाले आहेत. काल उमेदवारी दाखल करणार्‍या प्रमुखांमध्ये कोपरगावमध्ये आ. आशुतोष काळे आणि कर्जत-जामखेडमधून आ. शिंदे या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. उर्वरित ठिकाणी लहान-मोठ्या पक्षासह अपक्षांचा समावेश आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीचे पहिले चार संपले असून आता पुढील आठवड्यात सोमवार आणि मंगळवार हे दोनच दिवस बाकी आहे. यामुळे या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात उमेदवारी दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्ह्यात नगर शहर मतदारसंघ वगळता उर्वरित ठिकाणच्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख लढती स्पष्ट झाल्या आहेत. मात्र, अनेक ठिकाणी माघारीनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

शुक्रवारी जिल्ह्यात 20 उमेदवारांनी 27 अर्ज दाखल केलेले आहेत. यात अकाले 1 उमेदवार 1 अर्ज, संगमनेर 0, शिर्डी 2 उमेदवार 2 अर्ज, कोपरगाव 2 उमेदवार 3 अर्ज, श्रीरामपूर 1 उमेदवार 2 अर्ज, नेवासा 0, शेवगाव 3 उमेदवार 4 अर्ज, राहुरी 1 उमेदवार 2 अर्ज, पारनेर 1 उमेदवार 1 अर्ज, अहमदनगर शहर 2 उमेदवार 2 अर्ज, श्रीगोंदा 3 उमेदवार 3 अर्ज, कर्जत-जामखेड 4 उमेदवार आणि 7 अर्ज यांचा सामवेश आहे.

यंदा अपक्षांची संख्या वाढणार

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी विरोधातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहेत. मात्र, यामुळे उमेदवारीसाठी तयारी करत असलेले अथवा इच्छुक असणार्‍यांची अडचण झाली आहे. यामुळे अनेक मतदारसंघात दमदार अपक्षांची संख्या वाढणार असून याबाबतचे चित्र माघारीनंतर स्पष्ट होणार असले तरी यंदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार हे निर्णायक भूमिका बजावणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या