Wednesday, January 15, 2025
Homeक्राईमचाळे सुरू असलेल्या कॅफेवर छापा

चाळे सुरू असलेल्या कॅफेवर छापा

कोतवाली पोलिसांची कोर्ट गल्लीत कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील कोर्ट गल्ली येथे कॅफेच्या नावाखाली मुला-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार्‍यांवर कोतवाली पोलिसांनी सोमवारी सायंकाळी छापा टाकून कारवाई केली. कोर्ट गल्ली येथील ‘द परफेक्ट कॅफे’ मध्ये मुला- मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हे शाखेच्या पोलिसांना सदर ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले. पथकाने पंचासमक्ष सदर ठिकाणी छापा टाकला असता कॉलेजचे मुले- मुली अश्लील चाळे करताना मिळून आले.

- Advertisement -

कॅफेचा मॅनेजर अनुज शिवप्रसाद कुमार (वय 20 रा. उत्तर प्रदेश हल्ली रा. स्वामी शंकर हॉटेल कल्याण बायपास) याला ताब्यात घेतले. कॅफेचा मालक महेश पोपट खराडे (रा. रभाजीनगर केडगाव) हा असल्याचे त्याने सांगितले. कॅफेत मिळून आलेल्या मुला-मुलींना तोंडी समज देऊन सोडून देण्यात आले. मॅनेजर व मालक यांच्याविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक़ योगीता कोकाटे व विकास काळे, अंमलदार योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, सलीम शेख, संभाजी कोतकर, अभय कदम, अमोल गाढे, रिंकु काजळे, अनुप झाडबुके, सतीश शिंदे, पुजा दिख्खत, कोमल जाधव, पल्लवी रोहकले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या