Saturday, September 12, 2026
Homeब्रेकिंग न्यूजएकाच रात्री सात ठिकाणी घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास

एकाच रात्री सात ठिकाणी घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास

साकोरा | वार्ताहर Sakora

- Advertisement -

येथे शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य करीत सात घरांचे कुलपे तोडून दागिने व लाखो रूपयांची रोकड लंपास केल्याच्या प्रकाराने घबराट पसरली आहे.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेक कुटुंबे घराला कुलूप लावून छतावर झोपलेले असतात. याच संधीचा फायदा घेत शनिवारी रात्री चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी श्रीराम मंदिरालगत असलेल्या रोहिदास गल्लीतील देवबा ठाकरे, विजय ठाकरे, चिंधा ठाकरे तसेच राजवाडा भागातील व्यंकट निकम, कल्याबाई निकम, विजय निकम आदींच्या घरांचे कडी कोयंडे तोडून आत प्रवेश करीत घरातील दागिने व रोकड लंपास केली. देवबा ठाकरे व विजय ठाकरे सकाळी खाली आले असता त्यांच्या घरात चोरी झाल्याचे लक्षात आले.

घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले व घरातील कपाट न फुटल्याने चोरट्यांनी ते घरातून लांब अंतरावर शेतात नेत ते दगडाने फोडून त्यातील पन्नास हजार रुपयांची रोकड तसेच काही सोन्याचांदीचे दागिने घेऊन पोबारा केल्याचे समोर आले. दरम्यान, बाहेरगावी गेलेले घरमालक दुपारी घरी आल्यावर त्यांच्या घरातील रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले.

हा प्रकार नांदगाव पोलिसांना कळविण्यात आला. पोऊनि बढे व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी येत पाहणी केली. याबाबत नांदगाव पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या धर्मध्वजारोहण नियोजनाची बैठक; माजी महापौर आणि आयुक्तांमध्ये शाब्दिक...

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या धर्म ध्वजारोहण आणि ग्राम परिक्रमेच्या पूर्वतयारीसाठी शनिवारी (दि.१२) श्री शुक्ल यजूर्वेदिय ब्राह्मण संस्थेत रामसेतू पुलाजवळ बैठक आयोजित करण्यात...