Thursday, March 13, 2025
Homeनगरसिध्दराम सालीमठ नवे साखर आयुक्त

सिध्दराम सालीमठ नवे साखर आयुक्त

नगरमधून अवघ्या दोन वर्षात बदली

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ (Collector Siddharam Salimath) यांची अवघ्या दोन वर्षात बदली (Transfer) झाली. याबाबतचे आदेश मंगळवारी सायंकाळी निघाले असून यात राज्यातील अन्य आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्याची (IAS Officers Transfer) नावे आहे. जिल्हाधिकारी सालीमठ यांची राज्याच्या साखर आयुक्त (Sugar Commissioner) या रिक्त पदावर बदली करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, याबाबत थेट जिल्हाधिकारी सालीमठ यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी याबाबत कल्पना नसल्याची प्रक्रिया दिली आहे.

- Advertisement -

मंगळवारी सायंकाळी राज्य सरकारकडून आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या (IAS Officers Transfer) करण्यात आल्या. यात 9 अधिकार्‍यांसह जिल्हाधिकारी सालीमठ यांचे नाव आहे. मात्र, त्यांच्या जागी नवी नियुक्तीचे आदेश रात्री उशीरापर्यंत नव्हते. दरम्यान गेल्या दोन वर्षापासून सालीमठ नगरचे जिल्हाधिकारी (Collector Siddharam Salimath) म्हणून काम करत होते. त्या काळात अनेक नवीन उपक्रम त्यांनी राबविले. मागील आठवड्यात 14 फेबु्रवारीला जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला होता. सालीमठ मुळचे सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील असले तरी राहुरी कृषी विद्यापीठातील (Rahuri Agricultural University) उच्च शिक्षणाच्यानिमित्ताने नगरशी जोडले होते. त्यांच्या जिल्हाधिकारी पदाच्या कार्यकाळात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यात नगर राज्यात पहिल्या स्थानावर होता. तसेच प्रशासन गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या वापरावरही त्यांनी भर दिला. त्यामुळेच ई-ऑफीसच्या अंमलबजावणीत जिल्हा अग्रेसर राहिला.

गौणखनिज, ई-रेकॉड्स, ई-क्युजेकोर्ट प्रणाली, जलदूतद्वारे टंचाई व्यवस्थापन, भुसंपादन आदीसाठी माहिती तंत्रानाचा प्रभावीपणे वापर करण्यावर सालीमठ यांनी भर दिला. शासकीय यंत्रणेला जनतेच्या दारात नेण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात यशस्वी झाला. 24 लाखाहून अधिक नागरिकांना याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ झाला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 12 लाख 6 हजार महिलांना लाभ देण्यात आला. साडेपाच लाख शेतकरी बांधवांनाही पीक विमा योजनेअंतर्गत सामावून घेता आले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतील वैयक्तिक लाभार्थी मंजूर प्रकल्प संख्येनुसार जिल्हा गतवर्षी प्रथम क्रमांकावर होता. महाडीबीटी पोर्टलवर (Maha DBT Portal) 1 लाखाहून अधिक शेतकर्‍यांना लाभ देणारा नगर हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. मुख्यमंत्री शाश्वत शेतीसिंचन योजनेअंतर्गत राज्यात सर्वाधिक वैयक्तिक शेततळे पूर्ण करण्याचा मान जिल्ह्याला मिळाला आहे.

दरम्यान सालीमठ यांच्यासह कोकण विभागाचे विभागीय आयुक्त राजेश देशमुख, नयना गुंडे यांची नाशिक आदिवासी विकास आयुक्तपदावरून पुण्यात महिला व बालकल्याण आयुक्त म्हणून बदली झाली आहे. तर विमला आर या आता नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आणि सचिव असणार आहेत. मिलिंदकुमार साळवे यांची भंडारा येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी पदावर तर धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे हे सोलापूर महानगरपालिकेत आयुक्त पदावर, राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या नाशिक आयुक्त यांची नाशिकमध्येच आदिवासी विकास आयुक्त म्हणून बदलीचे आदेश असून गडचिरोलीचे सहायक जिल्हाधिकारी राहुल कुमार मीना यांची लातूर झेडपी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...