Friday, November 6, 2026
HomeनगरAhilyanagar : जिल्हा बँकेसाठी अवघी एकाची माघार

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी अवघी एकाची माघार

दसर्‍यानंतरच होणार उमेदवारांचे सिमोलंघन

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याची घोषणा केल्यानंतर मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दखल झालेले आहे. छानणीनंतर वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसात शेतीपूरक मतदारसंघातून एका उमेदवाराची माघार झाली असून अद्याप अनेक मतदारसंघात मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज शिल्लक आहेत.

- Advertisement -

दरम्यान, जिल्हा बँकेसाठी 22 ऑक्टोबरपर्यंत माघारीसाठी मुदत असून यामुळे खर्‍याअर्थाने दसर्‍यानंतर उमेदवारी माघारीचे सिमोलंघन करणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान, जिल्हा बँकेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्धार खा. निलेश लंके व माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समविचारी उमेदवारांसोबत नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीला इच्छुक उमेदवार व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकर्‍यांची बँक असून, तिच्या माध्यमातून शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळतो. त्यामुळे बँकेचा कारभार सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या हिताचा राहिला पाहिजे, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली.

मात्र, शेतकर्‍यांची बँक न राहता ठराविक कारखानदारांची व भांडवलदारांची झाल्याची टीकाही करण्यात आली. त्यामुळे बँकेची निवडणूक ताकदीने लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसरीकडे बँकेसाठी माघारीच्या दोन दिवसात अवघा एकच उमेदवारी अर्जाची माघार झालेली असून शेतीपूरक मतदारसंघातून त्रिंबक सरोदे यांचा अर्ज माघारी घेण्यात आला असल्याचे बँक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावतीने सांगण्यात आले.

निकालाच्या नक्कल घेण्यासाठी गर्दी
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाच्या छानणीनंतर झालेल्या सुनावणीत आणि आक्षेप प्रक्रियेनंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निकाल देत छानणीनंतर निवडणुकीसाठी पात्र असणार्‍यांची नावांची यादी प्रसिध्द केली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निकालाविरोधात दाद मागण्यासाठी गुरूवारी सकाळपासून मोठ्या संख्येने निकालाची अधिकृत नक्कल घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. निवडणुकीसाठी दाखल अर्जावर 14 हरकती घेण्यात आल्या होत्या. या सर्व हरकती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निकाली काढलेल्या असून या हरकती दाखल करणारे बहुतांशी उमेदवारांच्यावतीने निकालाची अधिकृत नक्कल घेण्यासाठी धडपड सुरू होती.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दिवाळी होताच चेअरमनपदाचा बार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचा मंगळवार (दि. 3) रोजी निकाल जाहीर झाला असून, बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी येत्या 12 नोव्हेंबर रोजी संचालक...