Friday, October 23, 2026
HomeनगरAhilyanagar : नगर जिल्हा बँकेसाठी 2 नोव्हेंबरला मतदान?

Ahilyanagar : नगर जिल्हा बँकेसाठी 2 नोव्हेंबरला मतदान?

प्रारूप निवडणूक कार्यक्रम अंतिम मंजुरीसाठी सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता आहे. येत्या 2 नोव्हेंबरला मतदान आणि 3 नोव्हेंबरला मतमोजणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. निवडणुकीचा प्रारूप कार्यक्रम तयार करून तो अंतिम मंजुरीसाठी सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आता प्राधिकरणाच्या मंजुरीकडे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांसह राजकीय गटांचे लक्ष लागले आहे. दरम्यान 8 नाव्हेंबरला दिवाळी असून त्यापूर्वीच 2 नाव्हेंबरला मतदान होणार असल्याने आठ दिवस आधीच जिल्हा बँकेच्या मतदारांची दिवाळी होणार आहे.

- Advertisement -

प्रस्तावित कार्यक्रमानुसार 28 ऑक्टोबरपासून पुढील पाच दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर छाननी, माघारीची प्रक्रिया पूर्ण करून गरज भासल्यास 2 नोव्हेंबरला जिल्हा बँकेच्या 21 संचालकांच्या जागांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. मतदान झाल्यास दुसर्‍याच दिवशी, म्हणजे 3 नोव्हेंबरला मतमोजणी करण्याचे नियोजन आहे. यंदा 8 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन असल्याने त्याच्या तब्बल आठ दिवस आधी जिल्हा बँकेसाठी मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेची निवडणूक अधिकच रंगण्याची चिन्हे आहेत. विशेषतः बँकेच्या संचालक मंडळात स्थान मिळविण्यासाठी इच्छुक असलेल्या दावेदारांच्या राजकीय हालचालींना आता वेग येणार आहे. लक्ष्मीची कृपादृष्टी नेमकी कोणावर पडणार, याचे उत्तर मात्र निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर शिक्कामोहर्तब
विभागीय सहनिबंधक संभाजीराव निकम यांची जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार विभागाने बँकेची अंतिम मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आता निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सहकार विभागाने तयार केलेला प्रारूप निवडणूक कार्यक्रम अंतिम मंजुरीसाठी सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे पाठविला आहे. प्राधिकरणाने प्रस्तावित कार्यक्रमाला मंजुरी दिल्यास 2 नोव्हेंबरचा मतदानाचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र प्राधिकरणाने कार्यक्रमात काही बदल किंवा सुधारणा सुचविल्यास मतदानाची तारीख पुढे जाण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

रील स्टार निघाले लुटारू! ९ हजारांची रोकड, सोन्याचे दागिने आणि दुचाकी...

0
पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) सोशल मीडियावर रील बनवून प्रसिद्धी मिळविणारेच लुटारू निघाल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डी तालुक्यातील शेकटे फाट्याजवळ घडल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. पाथर्डी-कोरडगाव रस्त्यावर...