Friday, October 2, 2026
HomeनगरAhilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

खा. लंके, आ. काळे, आ. राजळे, आ. लहामटे, आ. दाते, माजी आ. घुले, पिचड यांच्यासह दिग्गज मैदानात

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले. खासदार नीलेश लंके, आमदार आशुतोष काळे, आमदार मोनिका राजळे, आमदार किरण लहामटे, आमदार काशिनाथ दाते, माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि वैभव पिचड यांच्यासह बँकेचे माजी अध्यक्ष व संचालकांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, गुरुवारी आणखी 166 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेल्याने अर्जविक्रीचा आकडा 846 वर पोहोचला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार, दि. 5 ऑक्टोबर हा शेवटचा दिवस असल्याने अखेरच्या दिवशी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न सुरू असतानाच इच्छुकांची वाढती संख्या आणि दाखल होणारे उमेदवारी अर्ज यामुळे नेत्यांसमोरील आव्हान वाढले आहे. अर्जांची मोठ्या प्रमाणावर झालेली विक्री आणि प्रत्यक्ष उमेदवारी दाखल करण्याचा वाढता वेग पाहता, बिनविरोध निवडणुकीसाठी नेत्यांना मोठी कसरत करावी लागण्याची चिन्हे आहेत.

गुरुवारी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघांत अनेक प्रमुख इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नगर तालुक्यात बाळासाहेब हराळ, पाथर्डी तालुक्यात आमदार मोनिका राजळे व कडूचंद्र शेटे, तर अकोले तालुक्यात आमदार किरण लहामटे, शरद चौधरी, संजीवनी शिंदे, सीताराम गायकर, बाबासाहेब भोर, रावसाहेब वाकचौरे, कैलास वाकचौरे, माजी आमदार वैभव पिचड आणि विकासराव शेटे यांचा समावेश आहे. राहुरी तालुक्यात हर्ष तनपुरे, जामखेडमध्ये अमोल राळेभात व सचिन घुमरे, तर कोपरगावमध्ये संजय शिंदे व अनिल कदम यांनी अर्ज दाखल केले. कर्जत तालुक्यात तुषार पिसाळ, अंबादास पिसाळ, देविदास देशमुख, मंगेश जगताप, मंजुषा गुंड व ज्योती शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. श्रीरामपूरमधून करण ससाणे, श्रीगोंद्यातून राजेंद्र नागवडे, शेवगावमधून माजी आमदार चंद्रशेखर घुले व राजश्री चंद्रशेखर घुले, तर पारनेरमधून गीतांजली शेळके, आमदार काशिनाथ दाते आणि खासदार नीलेश लंके यांनी अर्ज दाखल केले आहेत.

शेतीपूरक व शेतमाल प्रक्रिया संस्था मतदारसंघातून राजेंद्र नागवडे, गंगाराम धुमाळ, रामदास आंब्रे, प्रकाश नाईकवाडी, सदाशिव पोखरकर, आमदार आशुतोष काळे, रावसाहेब वाकचौरे आणि अंकुश शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बिगरशेती संस्था मतदारसंघातून राजेंद्र नागवडे, बाळासाहेब नाईकवाडी, परिघा आरोटे, अविनाश कानवडे, संजय भळगट, नंदकिशोर औताडे, वसंत लोढा, सचिन देसर्डा, जनार्दन पठारे, अशोक थोरे आणि अमोल गर्जे यांच्यासह विविध इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. महिला राखीव मतदारसंघातून अनुराधा नागवडे, सुवर्णा लहामगे, संजीवनी शिंदे, सोनल गायकवाड, जयमाला सोले पाटील, रेखा नवले, मंजुषा गुंड, शैलजा लोटके आणि संगीता जयंत वाघ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

ओबीसी मतदारसंघातून अण्णासाहेब शेलार, शरद चौधरी, करण ससाणे, नितीन खेतमाळीस, अंकुश शेळके आणि कडूचंद्र शेटे यांनी अर्ज दाखल केले आहेत. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून आमदार किरण लहामटे, तुकाराम मेंगाळ, प्रकाश सदाफुले आणि वैभव पिचड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एनटी राखीव मतदारसंघातून सुनीता नगरे, अशोक महानवर, ऋषिकेश ढाकणे आणि अशोक थोरे यांचेही अर्ज दाखल झाल्याची माहिती देण्यात आली.

अखेरच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग ?
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय सहमती घडवून आणून जास्तीत जास्त जागा बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, विविध मतदारसंघांतील इच्छुकांची संख्या आणि अर्जविक्रीचा वाढता आकडा पाहता जागावाटपाचा तिढा सोडविणे नेत्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. सोमवार हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्या दिवशी आणखी किती उमेदवार मैदानात उतरतात आणि बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांना कितपत यश मिळते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Accident News : अज्ञात वाहनाची बुलेटला धडक; माळीचिंचोराचे तिघे जागीच ठार

0
नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावरील पुनतगाव फाटा येथे बुलेटला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या...