Sunday, November 22, 2026
HomeनगरAhilyanagar : जिल्हा बँकेच्या पहिल्या महिन्यांचे मानधन स्नेहालयला

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या पहिल्या महिन्यांचे मानधन स्नेहालयला

डॉ. सुजय विखे पाटील यांचा निर्णय

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मिळणार्‍या पहिल्याच महिन्यांच्या मानधनाचा विनियोग डॉ. सुजय विखे पाटील यांनी सामाजिक कार्यासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या महिन्याचे संपूर्ण मानधन त्यांनी अहिल्यानगरमधील स्नेहालय या सामाजिक संस्थेला देण्याचे ठरविले असून यापुढेही दर महिन्यांला मिळणारे मानधन वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना देण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.

- Advertisement -

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डॉ. विखे पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयाची चर्चा होत आहे. सार्वजनिक पदावर काम करताना मिळणार्‍या मानधनाचा उपयोग समाजातील गरजू घटकांसाठी व्हावा, अशी त्यामागची भूमिका आहे. त्यामुळे पहिल्या महिन्याच्या मानधनासाठी त्यांनी स्नेहालय संस्थेची निवड केली. समाजातील वंचित, निराधार आणि गरजू घटकांसाठी स्नेहालय संस्था अनेक वर्षांपासून काम करत आहे. सामाजिक प्रश्नांवर केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष मदतीच्या माध्यमातून काम करणार्‍या संस्थांना आर्थिक बळ मिळणे आवश्यक असते. अशा संस्थांच्या कार्याला हातभार लावण्याच्या उद्देशाने डॉ. विखे पाटील यांनी आपले मानधन संस्थेला देण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून शेतकरी आणि सहकार क्षेत्राच्या प्रश्नांवर काम करण्याची मोठी जबाबदारी असताना सामाजिक क्षेत्रातील संस्थांचाही विचार करण्याची भूमिका डॉ. विखे पाटील यांनी घेतली आहे. त्यांच्या या निर्णयातून सार्वजनिक जीवनातील जबाबदारी केवळ पदाच्या कामकाजापुरती मर्यादित नसून समाजाप्रती असलेल्या बांधिलकीशीही जोडलेली आहे. पहिल्या महिन्याचे मानधन स्नेहालयला देण्यापासून सुरू झालेला हा उपक्रम पुढील काळात विविध सामाजिक संस्थांना आधार देणारा ठरणार आहे.

ताज्या बातम्या

Newasa : नेवाशात अडविला साखरेचा ट्रक

0
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa उसाला 4 हजार 500 रुपये प्रतिटन पहिली उचल द्यावी आणि रेवेन्यू शेअरिंग फॉर्म्युला प्रमाणे रास्त भाव मिळावा या मागणीसाठी नेवासा तालुका...