Sunday, November 22, 2026
Homeक्राईमCrime News : धमकी देत विवाहितेवर अत्याचार

Crime News : धमकी देत विवाहितेवर अत्याचार

फोटो डिलीट करण्याच्या आमिषाने हॉटेलमध्ये नेले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

इन्स्टाग्राम अकाऊंटवरून संपर्क साधत विवाहितेला तिचे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन भेटण्यास बोलावले. त्यानंतर तिला मोटारसायकलवरून हॉटेलमध्ये नेऊन फोटो डिलीट करण्याच्या आमिषाने तिच्यावर इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याची घटना नगर शहरातील भिस्तबाग महाल परिसरात घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध अत्याचारासह धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

23 वर्षीय पीडित महिलेने 20 नोव्हेंबर रोजी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सिद्धार्थ थोरवे (रा. सोलापूरवाडी, जि. बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 नोव्हेंबर रोजी सकाळी आरोपीने फिर्यादीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कॉल केला. तू मला भेटण्यासाठी प्रोफेसर चौकात ये, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करेन, अशी धमकी देत त्याने फिर्यादीला भेटण्यासाठी बोलावले. त्यानुसार फिर्यादी सकाळी पावणेबाराच्या सुमारास प्रोफेसर चौकात गेल्या असता आरोपीचा पुन्हा इन्स्टाग्रामवर कॉल आला.

त्यानंतर आरोपी मोटारसायकलवरून तेथे आला आणि फिर्यादीला गाडीवर बसण्यास सांगितले. आरोपीने फिर्यादीला मोटारसायकलवरून भिस्तबाग महालाजवळील हॉटेलमध्ये नेले. हॉटेलच्या मागील बाजूने जात एका खोलीत नेल्यानंतर त्याने फिर्यादीला मॉर्फ केलेले फोटो दाखवले. माझ्याशी शारीरिक संबंध ठेव, मी तुझे सर्व फोटो डिलीट करतो. नकार दिल्यास फोटो व्हायरल करेन, अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

ताज्या बातम्या

Crime News : बनावट सही करून शासकीय कार्यालयांना अर्ज

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar एका व्यक्तीच्या नावाने खोटा अर्ज तयार करून त्यावर बनावट सही करण्यात आली. हा अर्ज खरा असल्याचे भासवून विविध शासकीय कार्यालये आणि प्राधिकरणांकडे...