Sunday, November 22, 2026
Homeक्राईमCrime News : बनावट सही करून शासकीय कार्यालयांना अर्ज

Crime News : बनावट सही करून शासकीय कार्यालयांना अर्ज

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

एका व्यक्तीच्या नावाने खोटा अर्ज तयार करून त्यावर बनावट सही करण्यात आली. हा अर्ज खरा असल्याचे भासवून विविध शासकीय कार्यालये आणि प्राधिकरणांकडे पोस्टाद्वारे पाठविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात संबंधित व्यक्तीच्या नावासह त्याच्या मोबाईल क्रमांकाचाही गैरवापर करण्यात आला असून, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याप्रकरणी राशीकांत मगर (वय 37, रा. मगर मळा, ससेवाडी रोड, जेऊर, ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 ऑक्टोबर 2026 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, नगर येथे हा प्रकार घडला. 20 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीने राशीकांत मगर यांच्या नावाने खोटा अर्ज तयार केला. त्यानंतर या अर्जावर त्यांच्या नावाने बनावट स्वाक्षरी करण्यात आली. संबंधित अर्ज खरा असल्याचे भासवून तो विविध शासकीय कार्यालये व प्राधिकरणांकडे पोस्टाद्वारे पाठविण्यात आला.

यासाठी फिर्यादीचे नाव तसेच ते वापरत असलेल्या मोबाईल क्रमांकाचा परस्पर वापर करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आपल्या नावाचा आणि मोबाईल क्रमांकाचा गैरवापर करून बनावट अर्ज शासकीय यंत्रणांकडे पाठविण्यात आल्याने मगर यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार पुढील तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Crime News : धमकी देत विवाहितेवर अत्याचार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar इन्स्टाग्राम अकाऊंटवरून संपर्क साधत विवाहितेला तिचे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन भेटण्यास बोलावले. त्यानंतर तिला मोटारसायकलवरून हॉटेलमध्ये नेऊन फोटो डिलीट...