Sunday, November 22, 2026
HomeनगरShirdi : शिर्डीत कार्तिकी एकादशी उत्सव उत्साहात

Shirdi : शिर्डीत कार्तिकी एकादशी उत्सव उत्साहात

50 हजारांहून अधिक भाविकांनी घेतला साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानच्या वतीने कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित स्थानिक उत्सव शनिवारी भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त साईप्रसादालयात भाविकांसाठी साबुदाणा खिचडीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभरात 50 हजारांहून अधिक भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

- Advertisement -

महाप्रसादाच्या तयारीसाठी संस्थानच्या वतीने 55 पोती साबुदाणा, 40 पोती शेंगदाणे, 780 किलो शेंगदाणा तेल, सुमारे 2 हजार 685 किलो बटाटे आणि अन्य आवश्यक साहित्याचा वापर करण्यात आला. भाविकांच्या सेवेसाठी प्रसादालयातील कर्मचारी आणि सेवेकरी अहोरात्र कार्यरत होते. उत्सवानिमित्त संस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत ह.भ.प. उत्तम महाराज गाडे (वैजापूर) यांचा कीर्तन कार्यक्रम श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपातील व्यासपीठावर आयोजित करण्यात आला आहे.

तसेच, रात्री 9.15 वाजता श्रींच्या पालखीची शिर्डी गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. पालखी समाधी मंदिरात परतल्यानंतर श्रींची शेजारती संपन्न होणार आहे. पालखी मिरवणुकीसाठी संस्थानच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी झाली होती. साईनामाच्या जयघोषाने संपूर्ण शिर्डी नगरी दुमदुमून गेली होती. मंदिर परिसरात सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या पहिल्या महिन्यांचे मानधन स्नेहालयला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मिळणार्‍या पहिल्याच महिन्यांच्या मानधनाचा विनियोग डॉ. सुजय विखे पाटील यांनी सामाजिक कार्यासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या...