अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बिनविरोध न झालेल्या दहा जागांसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या जागांसाठी आज, मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली. दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या सत्तेच्या सारीपाटावर उर्वरित दहा जागांवर कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
यात आता विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदारसंघात अकोलेत- संजीवनी शिंदे यांनी बाजी मारली आहे. यात आमदार किरण लहामटे यांचा पराभव झाला आहे. संजीवनी शिंदे 49 मते तर आमदार किरण लहामटे 36 मते पडली आहे. पारनेरमध्ये खा. निलेश लंके विजयी झाले आहे. खा. लंके यांना 64 तर राहुल शिंदे यांना 40 मते पडली. कर्जतमध्ये ज्योती प्रकाश शिंदे (विजयी) 54 तर तुषार अंबादास पिसाळ यांना 20 मते पडली. राहुरीत प्राजक्त तनपुरे 89 (विजयी) सत्यजित कदम यांना 18 मते मिळाली.




