Tuesday, November 10, 2026
HomeनगरAhilyanagar : जिल्हा बँकेत आणखी दोन माघार

Ahilyanagar : जिल्हा बँकेत आणखी दोन माघार

विखे-थोरात विरोधात लढणार कोण? सर्वांची उत्सुकता

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मंगळवारी आणखी दोन इच्छुकांनी माघार घेतली असून यामुळे माघार घेतलेल्यांची संख्या आता पाच झालेली आहे. दरम्यान, जिल्हा बँक बिनविरोधच्या अजेंड्याखाली एकत्र आलेल्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी खा. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात कोण लढणार याबाबत जिल्हाभरात उत्सुकता निर्माण झाली आहे.

- Advertisement -

जिल्हा बँकेचे निवडणुकीसाठी येत्या 21 तारखेपर्यंत उमेदवारी माघारीची मुदत आहे. जिल्ह्यात छाननीनंतर 250 हून अधिक उमेदवार यांच्या अर्ज पात्र ठरलेले असून यापैकी अवघ्या पाच इच्छुकांनी आत्तापर्यंत माघार घेतलेली आहे. आता माघारीची मुदत जवळ येत असल्याने नेत्यांसह सर्वांची उत्सुकता ताणली गेली आहे. बँकेच्या रिंगणातून कोण माघार घेणार आणि कोण लढणार याकडे सर्वांच्या नजरा टिकलेल्या आहेत. दरम्यान बिनविरोधच्या अजेंड्याखाली एकत्र आलेल्या विखे- थोरात यांना जिल्ह्यातून कोण टक्कर देणार, दोन दिवसापूर्वी जिल्ह्यातील एका राजकीय गटांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतलेल्या असून पवार या निवडणुकीत जीव ओतणार की लांबूनच बागेची भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.

बँकेचे या निवडणुकीत विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे, किरण लहामटे, विवेक कोल्हे, अक्षय कर्डिले, काशिनाथ दाते, प्राजक्त तनपुरे, आशुतोष काळे, विठ्ठलराव लंघे, माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार वैभव पिचड, माजी खासदार सुजय विखे पाटील, माजी आमदार चंद्रशेखर घुले, राहुल जगताप यासह अन्य इच्छुक यांनी उमदेवारी दाखल केल्या होत्या. यातील शंकराव गडाख बिनविरोध झालेले असून घुले बिनविरोधच्या मार्गावर आहेत.

बनबडे, नेटके आणि बनकार यांची माघार
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मंगळवारी बिगर शेती मतदारसंघातून राजेंद्र बरबडे आणि बापूसाहेब नेटके यांच्यासह ओबीसी मतदारसंघातून रणजित बनकर यांनी माघार घेतलेली आहे.

ताज्या बातम्या

सतेज

उद्ध्वस्त करतो, बघून घेतो अशा धमक्या माझ्याजवळ चालणार नाहीत; सतेज पाटलांचे...

0
कोल्हापूर | Kolhapurगोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर कोल्हापुरातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका करताना...