अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात गायवर्गीय जनावरांमध्ये लम्पी आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणावर आढळू लागला आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने निर्णय मोठा जाहीर केला आहे. फैलाव वाढलेल्या गावांसह संपूर्ण जिल्हा लम्पी बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व गावे आता लम्पी नियंत्रित क्षेत्र ठरणार असून या ठिकाणी जनावरांची खरेदी विक्री, बाजार, शर्यती, वाहतूक यासह सार्वजनिक ठिकाणी जनावरे एकत्र आण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी याबाबत आदेश काढले असल्याची माहिती पशूसंवर्धन विभागाच्यावतीने देण्यात आली. जिल्ह्यात सध्या संगमनेर तालुक्यातील साकूर, बिरेवडी, मांडवे, कनोली, रहिमपूर, निमगावजाळी, चिंचपूर, शिपलापूर, पिंपरी, शेवगावमधील वडुले, जामखेडमधील खर्डा या ठिकाणी जनावरांमधील लम्पीचा संसर्ग अधिक असल्याचे पशूसंवर्धन विभागाला दिसून आले आहे. या ठिकाणी लम्पीचा फैलाव वाढल्याने संबंधीत गाव व त्यांच्या पाच किलोमीटर त्रिज्येच्या परिसरास पशूसंवर्धन विभाग व जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत लम्पी आजाराचा फैलाव वाढत आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्यांची धावपळ उडाली आहे. हे लक्षात घेऊनच जिल्हाधिकार्यांनी संपूर्ण जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केला आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 888 बाधित जनावरे आढळून आली असून त्यापैकी 514 जनावारे लम्पीमुक्त झाली आहेत. तर 374 जनवारांवर उचार सुरू आहेत. त्यापैकी 8 अत्यवस्थत आहेत. आतापर्यंत 35 जनावरे मृत्युमुखी पडली.
बाधित पशुधनाच्या संपर्कात असलेली कोणत्याही प्रकराची वैरण, गवत अन्य साहित्य. प्राण्याचे शव, कातडी कोणताही भाग, प्राण्यांचे उत्पादन याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात यावी अशा सुचना देण्यात आल्या आहेत. प्राण्याचा बाजार भरण्यावर प्रतिबंध करण्यात आला आहे. त्याबरोबर शर्यती, जत्रा, प्रदर्शन यावर प्रतिबंध करण्यात आला असून त्याचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रमाणे जिल्हाधिकार्यांनी सूचना दिल्या असून त्याचे पालन न करणार्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्याबरोबर प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण पशुसंवर्धन विभागाने तातडीने करावे. ही जबाबदारी ज्या अधिकार्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यांनी ती व्यवस्थित पार पाडण्याचे देण्यात आले आहेत.
स्थानिक प्रशासनासह गृह विभागावर जबाबदारी
जिल्ह्यात आता जनावरांची होणारी वाहतूक थांबवण्यात आली असून या ठिकाणी ही वाहतूक होणार नाही, याची दक्षता परिवहन विभागाने घ्यावी, तसेच स्थानिक प्रशासनाने जनावरांचा एका भागातून दुसर्या भागात प्रवेश होणार नाही बाधित जनावरांच्या स्वतंत्रण पाणी व चार्यांची व्यवस्था करावी, भटक्या पशूधनाचे नियमित निरिक्षण करावे, जनावरांच्या बाजार बंदीवर कृषी उत्पन्न समिती व गृह विभागाने नियंत्रण ठेवावे, बाधित जनावरांच्या संपर्कात आलेल्या चार्याची विल्हेवाट लावावी, गायी व म्हशीचे विलगीकरण करावे, यासाठीचे नियोजन स्थानिक स्वराज्य संस्थांनी करण्याचे आदेशात स्पष्ट केले आहे.




