Sunday, August 16, 2026
HomeनगरAhilyanagar : जिल्ह्यातील आमदारांना आले 26 कोटी

Ahilyanagar : जिल्ह्यातील आमदारांना आले 26 कोटी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमातंर्गत 266 विधानसभा सदस्य आणि 52 विधानपरिषद सदस्य अशा एकूण 318 विधानमंडळ सदस्यांना एकूण 636 कोटी रूपयांचा निधी जिल्हाधिकार्‍यांकडे अधिनस्त ठेवण्यात आला आहे. यात नगर जिल्हयातील विधानसभेचे 11 आमदार आणि विधान परिषदेचे दोन आमदार अशा एकूण 13 आमदारांना 26 कोटींचा निधी मिळणार आहे. राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन झाल्याने हा निधी देण्यात आलेला नाही.

- Advertisement -

ना. राधाकृष्ण विखे पाटील, आशुतोष काळे, अमोल खताळ, डॉ. किरण लहामटे, हेमंत ओगले, विठ्ठल लंघे, मोनिका राजळे, काशिनाथ दाते, संग्राम जगताप, विक्रम पाचपुते, रोहित पवार हे विधानसभा सदस्य आणि प्रा. राम शिंदे आणि सत्यजित तांबे या विधानपरिषद सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांना प्रत्येकी दोन कोटी रूपयांचा निधी मिळणार आहे. याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

महाराष्ट्र विधानमंडळ सदस्य स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येक आमदाराला त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी वार्षिक 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला जातो. हा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत रस्ते, पाणीपुरवठा व शैक्षणिक कामांसाठी वितरित केला जातो. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी हा निधी तीन टप्प्यांत देण्याची तरतूद आहे, तसेच 267 विधानसभा व 54 विधानपरिषद सदस्यांना याचा लाभ मिळतो. हा निधी पहिल्यांदाच मिळाल्याने विकास कामांना वेग येणार आहे.

ताज्या बातम्या

केलवडच्या आदिवासी तरुणाची कर्नाटक सीमेवर क्रूर हत्या; नातेवाईकांचा रस्ता रोको

0
राहाता (तालुका प्रतिनिधी) केलवड येथील गरीब आदिवासी समाजातील तरुणाची कर्नाटकच्या बॉण्ड्रीवर अत्याचार करून क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. अक्षय दशरथ रजपूत असे...