नाशिक | Nashik
शहरातील सिटी सेंटर मॉल (City Centre Mall) परिसरातील राहत्या घरात सेवानिवृत्त सहाय्यक मोटार परिवहन अधिकारी हेमंत गोविंद हेमाडे यांनी कौटुंबिक वादातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.१९) रोजी मध्यरात्री घडली आहे. या घटनेमुळे शहरातील प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक अंदाजानुसार, कौटुंबिक कारणातून त्यांनी आत्महत्या (Suicide) केली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीसांना सुसाईड नोट किंवा इतर काही ऐवज मिळाला आहे का? याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, हेमाडे हे गेल्यावर्षी डिसेंबर २०२५ मध्ये सेवानिवृत्त झाले होते. मात्र, आता त्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. गोळीबाराचा (Firing) आवाज येताच परिसरात मोठी खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली.




