Thursday, June 11, 2026
HomeनगरAhilyanagar : जिल्ह्याला रविवारपर्यंत यलो अलर्ट

Ahilyanagar : जिल्ह्याला रविवारपर्यंत यलो अलर्ट

उकाडा पुन्हा वाढला || पाच दिवसांपासून पावसाचा खंड

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मे महिन्यात जोरदार मान्सूनपूर्व पावसाद्वारे सुरूवात केल्यानंतर 1 जूनपासून जिल्ह्यात पाऊस गायब झाला. मात्र, दोन दिवसापासून पुन्हा पावसाला पोषक वातावरण तयार होताना दिसत असून येत्या 8 जूनपर्यंत भारतीय हवामान विभागाने नगर जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जाहीर केला आहे. दरम्यान, दिवसभर उन्हाचा चटका आणि रात्रीच्यावेळी उकाड्यात वाढ झाली असून यामुळे पावसासाठी पोषण तयार होताना दिसत आहे.

- Advertisement -

नगर जिल्ह्यात यंदा मे महिन्यात पावसाने जोरदार सुरूवात केली. विशेष करुन जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अनेक तालुक्यात दमदार पाऊस झाला. उत्तर नगर जिल्ह्यात या पावसाचे प्रमाण कमी आहे. दरम्यान मान्सूनचा वेग कमी झाल्याने गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातील पावसात खंड दिसत आहे. मात्र, लवकरच जिल्ह्यात पावसाचे आगमन होणार असल्याचे चित्र असून भारतीय हवामान विभागाने 8 जूनपर्यंत जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. गुरूवारी सायंकाळी नगर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात सोसायट्याच्या वार्‍यासह हलक्या स्वरूपात पाऊस झाला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राहुरीसह अन्य कृषी विद्यापीठांतील पद भरतीचा मार्ग मोकळा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळाली आहे. तब्बल 23 वर्षांनंतर विद्यापीठांच्या अ आणि ब संवर्गातील एकूण 3,723 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता...