Tuesday, June 16, 2026
HomeनगरCrime News : अल्पवयीन मुलीला डांबून अत्याचार; वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले

Crime News : अल्पवयीन मुलीला डांबून अत्याचार; वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

एका अल्पवयीन मुलीला डांबून ठेवत तिला बळजबरीने वेश्याव्यवसायात ओढल्याचा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी दोन जणांविरूध्द अत्याचार, पोक्सो आदी कलमान्वये अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुरूवारी (26 मार्च) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पीडित 16 वर्षीय मुलीने याबाबत फिर्याद दिली आहे. ती मुळची बीड जिल्ह्यातील असून सध्या पुणे जिल्ह्यात वाघोली तालुक्यामध्ये राहत आहे. अंजली ऊर्फ राणी परमेश्‍वर काळे (रा. वाघोली, जि. पुणे) व भैय्या ऊर्फ गणेश संपत गोरे (रा. रूईछत्तीशी, ता. अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. सदरची घटना फेब्रुवारी 2024 पासून सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही संशयित आरोपींनी तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. तसेच संशयित आरोपी भैय्या गोरे याने पीडितेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्याने आपल्या ताब्यातील वाहनातून पीडितेला बळजबरीने बसवून अहिल्यानगर मधील एका फ्लॅटवर नेले. तिथे तिला डांबून ठेवत तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. या संपूर्ण प्रकरणात अंजली काळे हिने देखील साथ दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

दरम्यान, वेश्याव्यवसाय बंद करण्यासाठी रूईछत्तीशी ग्रामस्थांनी उपोषण केले होते. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याची दखल घेतली आहे. मागील एक ते दोन वर्षांपासून दाखल न झालेले गुन्हा आता दाखल होत आहे. फेब्रुवारी 2024 पासून पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार सुरू होता. तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. तिने गुरूवारी (26 मार्च) फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश गांगुर्डे अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : ‘ती’ फाईल गंगापूररोडच्या एका बिल्डरची?

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता प्रदीप भामरे आणि भाजपचे नगरसेवक सतीश निकम (Satish Nikam) यांच्यात झालेल्या वादाच्या केंद्रस्थानी असलेली ती फाईल...