Wednesday, September 30, 2026
HomeनगरAhilyanagar Rainfall : जूनच्या पावसात ६० टक्क्यांपेक्षा अधिक तूट; पेरण्या रखडल्या

Ahilyanagar Rainfall : जूनच्या पावसात ६० टक्क्यांपेक्षा अधिक तूट; पेरण्या रखडल्या

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

जिल्ह्यात यंदा मान्सून लांबल्याचा मोठा फटका खरीप हंगामाला बसताना दिसत आहे. जून महिना संपत आला तरी जिल्ह्यात केवळ ४६.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने खरिपाच्या पेरण्या पूर्णपणे रखडल्या आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात जून महिन्याची सरासरी १०८ मि.मी. असते; मात्र यंदा प्रत्यक्षात अवघा ४३.३ टक्के सरासरीच्या तुलनेत टक्क्यांहून ६५ अधिक घट पाऊस झाला आहे. अद्याप सर्वदूर दमदार पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांसह कृषी विभाग आशेने आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.

- Advertisement -

गेल्या ११ वर्षांतील जून महिन्यातील हा सर्वात कमी पाऊस ठरला आहे. जिल्ह्यात साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून सक्रिय होतो. यंदा मात्र महिना संपत आला तरी सर्वदूर पाऊस न झाल्याने जमिनीत आवश्यक ओल निर्माण झालेली नाही. परिणामी, बहुतांश शेतक-यांनी पेरण्या थांबवून दमदार पावसाची प्रतीक्षा सुरू केली आहे. गेल्या वर्षी परिस्थिती याच्या नेमकी उलट होती. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल होती. त्यामुळे गेल्या वर्षी २६ जूनअखेर सुमारे तीन लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या होत्या, बंदा मात्र स्थिती अत्यंत नाजूक असून, पाऊस आणखी लांबल्यास खरिपाचे गणित कोलमडण्याची भीती आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामासाती ६ लाख ७४ हजार ४६१ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ २० हजार हेक्टरवर (सुमारे ३ ते ४ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. शुक्रवारी नेवासा तालुक्यात काही ठिकाणी दमदार पाऊस झाला असून, तिथे वाफ्ता (पेरणीयोग्य ओल) होलाच मशागत व पेरण्या सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, जोपर्यंत जमिनीत पुरेशी ओल होत नाही, तोपर्यंत शेतकयांनी घाईघाईने पेरण्या करू नयेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस राहुरी तालुक्यात अभ्या ७.५ टक्के नोंदगला गेला आहे. तर सर्वाधिक पाउन्स कर्जत तालुक्यात ११२.६ टके झाला आहे. जर जिल्ह्या तील अकोले, राहाता, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर या तालुक्यांमध्ये पाऊस अत्यंत कमी आहे. नगर ५.३ टके, पारनेर ३८ टक्के, श्रीगोंदा ६३ टक्के, कर्जल ११२. ८ टके, जामखेड २६ टके, शेवगाव ५६ टक्के, पाथर्डी ५६ टके, नेव ासा ७१ टक्के, राहुरी ७.५ टके, अकोले १०.९ टक्के, संगमनेर १६ टक्के, कोपरगाव १८ टक्के, श्रीरामपूर २२ टक्के, राहता १२ टक्के असा एकूण ४८.८ टक्के पाऊस झालेला आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : नाशिकमध्ये पुन्हा रस्ते खोदणार; मिळाली ‘इतक्या’ दिवसांची परवानगी

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik सिंहस्थाच्या (Simhstha) कामांसह विविध विकासकामांसाठी झालेली खोदकामे आणि खड्ड्यांमुळे शहरातील रस्त्यांची (Roads) झालेली वाताहत लक्षात घेता पावसाळ्यापर्यंत थांबविण्यात आलेली रस्ते...