Thursday, October 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजGunratan Sadavarte : "ठाकरे बंधूंनी शपथ घेऊन सांगावे मोर्चा नक्की कशासाठी?" गुणरत्न...

Gunratan Sadavarte : “ठाकरे बंधूंनी शपथ घेऊन सांगावे मोर्चा नक्की कशासाठी?” गुणरत्न सदावर्तेंची टीका

मुंबई | Mumbai

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार (Dnyanesh Kumar) यांच्या कार्यपद्धतीवर दोन सहआयुक्तांनी नाराजी व्यक्त केली होती, असे वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने मागील आठवड्यात प्रसिद्ध केले होते. गेल्या दहा महिन्यात त्यांच्या आक्षेपांकडे ज्ञानेश कुमारांनी दुर्लक्ष केले होते असा आरोप करण्यात आला होता. यावरून विरोधकांनी आक्रमक होत कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) सोशल मीडियावर पोस्ट करत निवडणूक प्रक्रियेतील घोळाविरोधात मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती. याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.

- Advertisement -

त्यानंतर काल (मंगळवारी) मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत मोर्चाचा मार्ग आणि वेळेची घोषणा केली. त्यानुसार येत्या रविवार (दि.४ ऑक्टोबर) रोजी हा मोर्चा भायखळा येथील रिचर्डसन अँड क्रुडास कंपनीपासून सुरुवात होणार असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) समोरील मुंबई महापालिका (BMC) मुख्यालयाजवळ सांगता होईल,अशी माहिती राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत दिली होती. दरम्यान ठाकरे बंधूंच्या या मोर्चावर प्रसिद्ध वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली आहे.

ठाकरे बंधूंनी शपथ घेऊन सांगावे मोर्चा नक्की कशासाठी?

सदावर्ते म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा (Morcha) म्हणजे धुरडा जोड गोळीचा मोर्चा आहे. संविधानापेक्षा कुणीही मोठे असू शकत नाही. त्यामुळे राज ठाकरे हे संविधानापेक्षा मोठे नाहीत. संविधानाने सीमा राखून ठेवली असून, त्याच्यापुढे कुणीही जाऊ शकत नाही. राज आणि उद्धव ठाकरे आझाद मैदान पर्यंत मोर्चा काढू शकत नाही त्याला कायदेशीर प्रतिबंध आहेत. या दोघांना मोर्चा नक्की काढायचा का आहे? हेच माहिती नाही. हा मोर्चा नक्की कशासाठी आहे हे त्यांनी शपथ घेऊन सांगावे. शेतकऱ्यांवर संकट आहे, त्यासाठी हा मोर्चा काढत आहात का? राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना सेकंडमध्ये काम करायची सवय कधी लागली? असा सवालही सदार्वेत यांनी केला.

अभिजित दीपकेंवर निशाणा

कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दीपके (Abhijeet Dipke) यांच्यावर टीका करताना सदावर्ते म्हणाले, “ते नवीन असून, त्यांनी एखादा मोर्चा काढून बघावा. त्याच्या मोर्चाला गर्दी जमली तर आमच्या मोर्चालाही गर्दी जमेल. ते पोरांची लिटमस टेस्ट करत आहेत, अशा शब्दांत सदावर्ते यांनी टीका केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज घेण्यासाठी झुंबड; दाखल करणार्‍यांची मात्र प्रतीक्षा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, अर्जांची विक्री मोठ्या प्रमाणात होत...