Wednesday, September 30, 2026
HomeनाशिकNashik MC News : सहा आठवड्यांत स्वीकृत नगरसेवक पदे भरा; उच्च न्यायालयाचे...

Nashik MC News : सहा आठवड्यांत स्वीकृत नगरसेवक पदे भरा; उच्च न्यायालयाचे महापालिकेला निर्देश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिकेतील (Nashik Municipal Corporation) दहा स्वीकृत नगरसेवकांच्या (Corporators) नियुक्तीचा रखडलेला प्रश्न आता मार्गी लागणार आहे. स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती प्रक्रिया येत्या सहा आठवड्यांत पूर्ण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी (दि.२९) झालेल्या सुनावणीत (Hearing) महापालिकेला दिले.

- Advertisement -

नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने आणखी चार महिन्यांची मुदत मागितली होती. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत सहा आठवड्यांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले. महापालिका निवडणुकीनंतर एका महिन्यात स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती अपेक्षित असताना अद्याप प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यावर न्यायालयाने प्रशासनाला प्रश्न विचारत नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.

महापालिकेत स्वीकृत सदस्यांच्या दहा जागा आहेत. पक्षीय संख्याबळानुसार भाजपला (BJP) सहा, शिंदेसेनेला दोन, तर उद्धवसेना आणि काँग्रेसला दोन जागा मिळण्याचे समीकरण आहे. काँग्रेसचे गरसेवक तथा गट नेत्ो सुफी जीन यांनी नियुक्तीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेमुळे या प्रकरणाला न्यायालयीन वळण मिळाले. न्यायालयाच्या आदेशामुळे आता प्रशासनाला निश्चित मुदतीत नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

ताज्या बातम्या

Aaditya Thackeray : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी राजकीय पक्षांकडूनच गुन्हेगारीला खतपाणी;...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai राजकीय पक्षांकडूनच गुन्हेगारीला खतपाणी घातले जात असून प्रदीप पुर्णेकर (Pradeep Purnekar) यांच्या हत्येमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या झाल्याचे पुन्हा...