Friday, April 3, 2026
HomeनगरAhilyanagar Election Result : अहिल्यानगरमध्ये सुरुवातीचे कल कोणाच्या बाजूने? कोण किती जागांवर...

Ahilyanagar Election Result : अहिल्यानगरमध्ये सुरुवातीचे कल कोणाच्या बाजूने? कोण किती जागांवर पुढे?

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

ओबीसी आरक्षणाच्या कायदेशीर पेचामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक अखेर गुरुवारी (दि. १५) पार पडली. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या कलानुसार टपाली मतदानामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने वर्चस्व राखल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

नगर महानगरपालिकेच्या एकूण १७ प्रभागांमध्ये ६८ जागा आहेत. यातील ५ जागांवर यापूर्वीच बिनविरोध निवड झाली असल्याने उर्वरित ६३ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. या जागांसाठी एकूण २८३ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले असून, शहराच्या विकासाची धुरा कोणाच्या हातात जाणार याचा फैसला आज होणार आहे.

गुरुवारी पार पडलेल्या मतदानादरम्यान शहरात काही ठिकाणी किरकोळ गोंधळ आणि तणावाचे प्रसंग उद्भवले. मात्र, प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवल्याने मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदारांनी मोठ्या उत्साहात केंद्रावर हजेरी लावली होती. दोन वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर होत असलेल्या या निवडणुकीमुळे राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

सकाळी टपाली मतांची मोजणी झाल्यानंतर आता प्रत्यक्ष ईव्हीएम (EVM) मशीनमधील मतांची मोजणी सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक कलानुसार महायुतीचे उमेदवार काही प्रभागांत आघाडीवर असल्याचे समजते. दुपारपर्यंत बहुतांश जागांचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता असून, अहिल्यानगरच्या सत्तेचे समीकरण कोणाकडे झुकते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ३ एप्रिल २०२६ – विनाशकाले ‘ट्रम्प’बुद्धी

0
सत्ता आणि अहंकार जेव्हा डोक्यात जातो, तेव्हा लोकशाहीचा प्रवास हुकूमशाहीकडे व्हायला वेळ लागत नाही. जगाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात मानवजातीने...