Friday, April 25, 2025
Homeनगरमनपाच्या मोकळ्या जागेवरील अतिक्रमणे हटवली

मनपाच्या मोकळ्या जागेवरील अतिक्रमणे हटवली

बालिकाश्रम रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याचा आयुक्तांचा इशारा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

बालिकाश्रम रस्त्यावरील व बोल्हेगाव येथील महानगरपालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागेत करण्यात आलेली अतिक्रमणे कारवाई करून हटवण्यात आली. महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग व प्रभाग समिती कार्यालयाने ही कारवाई केली. यात जागेतील पत्र्याचे शेड काढण्यात आले. महानगरपालिकेच्या मोकळ्या जागांवर असलेल्या अतिक्रमणांवर कारवाईसाठी प्रशासन सज्ज असून, येत्या काळात महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेत करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली जाणार आहे. तसेच, बालिकाश्रम रस्त्यावर दोन्ही बाजूंनी करण्यात आलेल्या अतिक्रमणांवरही लवकरच कारवाई सुरू होणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

- Advertisement -

बालिकाश्रम रस्त्यावर महानगरपालिकेच्या मालकीचा मोकळा भूखंड आहे. त्यावर काहींनी पत्र्याचे शेड उभारून दहा ते बारा टपर्‍या टाकल्या होत्या. या सर्व टपर्‍या, शेड गेल्या तीन दिवसांपासून कारवाई करून हटवण्यात आले. सुमारे अडीच एकर क्षेत्र मोकळे करण्यात आले आहे. त्याभोवती पत्र्याची संरक्षक भिंत करण्यात येणार आहे. तसेच, बोल्हेगाव येथेही महानगरपालिकेच्या एका मोकळ्या भूखंडावर पत्र्याचे शेड उभारून अतिक्रमण करण्यात आले होते. याबाबत वेळोवेळी तक्रारी झाल्या होत्या. हे अतिक्रमणही महानगरपालिकेच्या पथकाने कारवाई करून हटवले आहे.

सध्या पत्रकार चौक ते दिल्लीगेट वेस रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे बालिकाश्रम रस्त्यावर रहदारी वाढली आहे. या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आली आहेत. पत्र्याचे शेड, दुकानांचे जाहिरात फलक, फुटपाथवर साहित्य ठेवण्यात येते. या भागाची संपूर्ण पाहणी करण्यात आली आहे. तेथील अतिक्रमणे हटवण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येत आहे. लवकरच सर्व अतिक्रमणे हटवून बालिकाश्रम रस्त्याचा श्वास मोकळा केला जाईल, असेही आयुक्त डांगे यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...