Thursday, March 13, 2025
Homeनगरविद्रुपीकरण टाळण्यासाठी मनपाचे फ्लेक्समुक्त अहिल्यानगर अभियान

विद्रुपीकरण टाळण्यासाठी मनपाचे फ्लेक्समुक्त अहिल्यानगर अभियान

फलक लावणारे व फोटो असणार्‍यांवरही गुन्हे दाखल होणार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहराचे विद्रुपीकरण टाळण्यासाठी महानगरपालिकेने फ्लेक्समुक्त अहिल्यानगर अभियान हाती घेतले आहे. या अभियानास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे. शहरात फ्लेक्स लावण्यास अटकाव करण्यासाठी प्रभागस्तरावर समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. फलक लावणार्‍या व्यक्ती, संस्थांसह फलकांवर ज्याचे फोटो असतील, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे.

- Advertisement -

गेल्या महिनाभरापासून शहरात फ्लेक्स बोर्ड लावल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. मागील महिनाभरात 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता फ्लेक्स बोर्ड लावणार्‍या व्यक्तींवर अधिक प्रभावी व कठोर कारवाई हाती घेण्यात येत आहे. नागरिक, राजकीय कार्यकर्ते, संस्था, संघटनांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा असे व इतर फलक विनापरवाना लावू नयेत. अशा पध्दतीने फलक लावणार्‍या व्यक्तींवर लक्ष ठेऊन त्यांना अटकाव करण्यासाठी प्रभागसमिती स्तरावर समिती गठीत करण्यात येणार आहे. यात माजी नगरसेवक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आदींचा समावेश असणार आहे.

नागरिकांनीही या अभियानात सहभागी होऊन फ्लेक्समुक्त अहिल्यानगर करण्यासाठी, शहराचे विद्रुपीकरण टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डांगे यांनी केले आहे. यापुढे विनापरवाना फलक आढळल्यास फलक लावणारे व त्यावर ज्यांचे फोटो आहेत, अशा सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे, तसेच शहरात विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणार असल्याचे आयुक्त डांगे यांनी स्पष्ट केले.

परवाना क्रमांकाशिवाय फ्लेक्स छापण्यास मनाई
दरम्यान, परवाना क्रमांकाशिवाय फ्लेक्स छपाई करू नये, अशा सूचना आयुक्त डांगे यांनी छपाई व्यावसायिकांना दिल्या आहेत. फ्लेक्स छपाई करताना फ्लेक्सच्या कोपर्‍यात परवाना क्रमांक टाकणे यापुढे बंधनकारक करण्यात आले आहे. परवाना क्रमांक न टाकता फ्लेक्स छपाई करणार्‍या व्यावसायिकांवरही महानगरपालिकेकडून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही आयुक्त तथा प्रशासक डांगे यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...