Thursday, October 1, 2026
HomeनगरAMC : मनपाच्या रखडलेल्या सर्वसाधारण सभेला अखेर मुहूर्त

AMC : मनपाच्या रखडलेल्या सर्वसाधारण सभेला अखेर मुहूर्त

आज होणार महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब?

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमधील समन्वयाच्या अभावामुळे तहकूब झालेली आणि त्यानंतर विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. आता ही तहकूब झालेली सर्वसाधारण सभा आज (शुक्रवार) होणार आहे. त्यामुळे भाडेकरू दराने घरपट्टीचे मूल्यांकन रद्द करण्यासह व्यापारी संकुले व भुयारी गटार योजनेसाठी कर्ज, रस्त्यासाठी भूसंपादन आदी महत्त्वाच्या विषयांवरील रखडलेले निर्णय मार्गी लागण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

भाडेकरू दराने घरपट्टी मूल्यांकन रद्द करणे, गॅस पाइपलाइन खोदाई, कर्ज प्रस्ताव व भूसंपादन आदी महत्त्वाच्या विषयांवर 15 मे रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. या सभेतील विषयांबाबत विश्वासात न घेतल्याने भाजपकडून सभेला न जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवकही सभेकडे फिरकले नव्हते. गणपूर्ती (कोरम) अभावी ही सभा तहकूब करण्यात आली होती.

दरम्यानच्या काळात विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ही सभा लांबणीवर पडली होती. त्यामुळे भाडेकरू दराने घरपट्टी आकारणी रद्द करण्याचा निर्णय रखडला होता. मात्र, आता या तहकूब सभेची तारीख घोषित करण्यात आली आहे. तहकूब झालेली सर्वसाधारण आज सकाळी 11 वाजता होणार आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज घेण्यासाठी झुंबड; दाखल करणार्‍यांची मात्र प्रतीक्षा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, अर्जांची विक्री मोठ्या प्रमाणात होत...