Thursday, March 13, 2025
Homeनगरमनपाची अजूनही 206 कोटींची थकबाकी

मनपाची अजूनही 206 कोटींची थकबाकी

मालमत्ता करावरील शास्तीवर 100 टक्के सवलतीसाठी अखेरचे तीन दिवस शिल्लक

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगरच्या महापालिकेची नागरिकांकडे अद्यापही 206 कोटींची थकबाकी आहे. शहरातील सुमारे 75 हजार थकबाकीदारांनी कर भरलेला नाही. प्रशासनाने जाहीर केलेल्या मालमत्ता कराच्या शास्तीमध्ये 100 टक्के सवलत मिळवण्यासाठी अखेरचे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. थकबाकीदारांकडून थंड प्रतिसाद मिळत असल्याने महानगरपालिकेने जप्ती कारवाईची मोहीम हाती घेतली असल्याची माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

- Advertisement -

महानगरपालिकेने मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. थकबाकीदार मालमत्ताधारकांना जानेवारी अखेरपर्यंत शास्तीमध्ये 100 टक्के सवलत देण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत 4 हजार 700 थकबाकीदारांनी याचा लाभ घेतला असून त्या माध्यमातून 4.60 कोटींची वसुली झालेली आहे. थकबाकीदारांकडून थंड प्रतिसाद असल्याने महानगरपालिकेने जप्ती कारवाई सुरू केली आहे. शास्तीमध्ये 100 टक्के सवलत घेण्यासाठी अखेरचे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे थकबाकीदार मालमत्ताधारकांनी सवलतीचा लाभ घेऊन तात्काळ थकीत कराचा भरणा करावा व जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासन यशवंत डांगे यांनी केले आहे.

महानगरपालिका प्रशासनाने 8 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत मालमत्ता करावर शास्तीमध्ये शंभर टक्के सवलत दिलेली आहे. या काळात 8.18 कोटींची वसुली झाली आहे. त्यातील 3.58 कोटी रुपये शास्ती माफ करण्यात आली असून 4.60 कोटी रुपये वसूल झाले आहेत. केडगाव येथील मनपाच्या भाग्योदय शॉपिंग सेंटर येथील गाळेधारकांचे 15.50 लाख रुपये थकीत गाळे भाडे वसूल झाले आहे. अद्यापही 206 कोटींची थकबाकी आहे. सुमारे 75 हजार थकबाकीदारांनी कर भरलेला नाही. शास्तीमध्ये 100 टक्के सवलत घेण्यासाठी अखेरचे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. थकबाकीदारांकडून थंड प्रतिसाद मिळत असल्याने महानगरपालिकेने जप्ती कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

झेंडीगेट प्रभाग समिती कार्यालय अंतर्गत असलेल्या थकबाकीदारांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळालेला आहे. या प्रभागातील वसुली अत्यंत कमी आहे. त्यामुळे थकबाकीदारांना जप्तीच्या नोटीस बजावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. थकबाकीदार मालमत्ताधरकांनी शास्तीमध्ये 100 टक्के सवलत घेण्यासाठी अखेरचे तीन दिवस शिल्लक राहिले असल्याने तात्काळ सवलत घेऊन थकीत कराचा भरणा करावा, अन्यथा महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त तथा प्रशासक डांगे यांनी दिला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...