Tuesday, February 3, 2026
HomeनगरAhilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगरमध्ये बनावट मतदार ओळखपत्रांचा पर्दाफाश; दोघे रंगेहाथ पकडले

Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगरमध्ये बनावट मतदार ओळखपत्रांचा पर्दाफाश; दोघे रंगेहाथ पकडले

अहिल्यानगर । प्रतिनिधी

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान मतदारांवर गैरप्रकारे प्रभाव टाकण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, बनावट पध्दतीने मोठ्या प्रमाणात मतदार ओळखपत्रे वाटप केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द अदखलपात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन ओळख पटलेले संशयित आणि एका अनोळखी इसमाचा समावेश आहे.

- Advertisement -

या प्रकरणी चंद्रकांत सुर्यभान शेळके (वय 48, रा. सिव्हिल हाडको) यांनी तक्रार दिली आहे. गणेश कुंडलिक शेकडे (वय 34), सतिष नवनाथ शेकडे (वय 32, दोघे रा. म्हसोबाचीवाडी, ता. आष्टी, जि. बीड) व एक अनोळखी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार चंद्रकांत शेळके हे शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून प्रभाग क्रमांक 3 मधून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत आहेत. गुरूवारी (15 जानेवारी) शहरातील आनंद शाळा येथे मतदान प्रक्रिया सुरू होती.

YouTube video player

याच दरम्यान दुपारी सुमारे 1.45 वाजता शेळके आणि त्यांचे कार्यकर्ते सुनील हिवाळे हे पारीजात चौकात थांबले असता, एका इसमाकडून नागरिकांना मतदार ओळखपत्रे दिली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने शेळके यांनी त्या इसमास पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या इसमाकडे दोन्ही खिशांत मोठ्या प्रमाणावर मतदार ओळखपत्रे आढळून आली. शेळके यांनी त्याच्याकडील काही ओळखपत्रे ताब्यात घेतली; मात्र उर्वरित ओळखपत्रे घेऊन तो इसम घटनास्थळावरून पळून गेला. सदर इसमाचे नाव व पत्ता अद्याप माहित नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, घटनास्थळी मिळालेल्या 31 मतदार ओळखपत्रांमध्ये विविध व्यक्तींची नावे असून, त्यामध्ये गणेश कुंडलीक शेकडे व सतिष नवनाथ शेकडे यांचीही ओळखपत्रे आढळून आली. याच दरम्यान मतदानासाठी आलेले गणेश कुंडलीक शेकडे व सतिष नवनाथ शेकडे यांना त्यांच्या वास्तव्यासंबंधी विचारणा केली असता, त्यांनी समाधानकारक माहिती दिली नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या तिघांनी मिळून महानगरपालिका निवडणुकीत गैरप्रकारे हस्तक्षेप करून मतदारांवर प्रभाव टाकण्याच्या उद्देशाने तोतयागिरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शेळके यांच्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

मतदान केंद्रावर गोंधळ व तणाव
दरम्यान, सदरचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मतदान केंद्र परिसरात एकच गोंधळ उडाला. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी आक्रमक झाले होते. प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करत दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रति क्विंटलला सर्वाधिक 1400 रुपये भाव मिळाला. कांद्याची 3634 गोण्यांची आवक झाली. कांदा...