Tuesday, January 6, 2026
HomeनगरMunicipal Election : श्रीरामपूर, राहुरीत चौरंगी; संगमनेरात आमदारांचे नातेवाईक एकमेकांविरोधात भिडणार, शिर्डीत...

Municipal Election : श्रीरामपूर, राहुरीत चौरंगी; संगमनेरात आमदारांचे नातेवाईक एकमेकांविरोधात भिडणार, शिर्डीत सत्ता संघर्ष

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

जिल्ह्यातील १२ पालिकांच्या निवडणुकीचे शुक्रवारी चित्र स्पष्ट झाले असून २८९ सदस्यांसाठी १,२७४ तर नगराध्यक्षपदासाठी १०२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. काही पालिका निवडणुकीबाबत आक्षेप असलेल्या अर्जदारांनी निवडणूक न्यायालयात अपील केल्याने संबंधित प्रभागातील व नगराध्यक्ष उमेदवारांना २५ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. उमेदवारांना प्रचारासाठी पाच दिवसांचा वेळ मिळणार आहे.

- Advertisement -

श्रीरामपुरात नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांपैकी चार जणांनी माघार घेतल्याने करण ससाणे (काँग्रेस आघाडी), श्रीनिवास बिहाणी (भाजपा-राष्ट्रवादी युती), प्रकाश चित्ते (शिवसेना शिंदे गट), अशोक थोरे (शिवसेना, उबाठा), यांच्यात प्रमुख लढत होत आहे. तर या पदासाठी वसंत कोल्हे (अपक्ष), निलेश भालेराव (अपक्ष), जोएफ शेख (समाजवादी), आकाश शेंडे (बीएसपी), चरण त्रिभुवन (बंचित बहुजन आघाडी) असे नऊ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत.

YouTube video player

राहुरी नगराध्यक्षपदासाठी भाऊसाहेब छबुराव मोरे (विकास आघाडी), सुनील ठकाजी पवार (भाजपा), महाराष्ट्र केसरी गुलाब मोहन बर्डे (शिवसेना शिंदे गट पुरस्कृत), बापुसाहेब भाऊसाहेब माळी (बंचित बहुजन आघाडी), सखाहरी शांताराम बड़े (अपक्ष) हे निवडणूक रिंगणात आहेत. कोपरगावात बहुरंगी लढत होत आहे. संगमनेरात भाजपा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने नगराध्यक्ष पदासाठी महायुतीच्या सुवर्णा खताळ आणि संगमनेर सेवा समितीच्या डॉ. मैथिली तांबे यांच्यात मुख्य लढत होणार असल्याचेच दिसत आहे. सुवर्णा खताळ महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या भावजयी आहेत. तर मैथिली तांबे या विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या धर्मपत्नी आहेत.

शिर्डी नगराध्यक्षपदासाठी भाजप पक्षाकडून जयश्रीताई विष्णू थोरात, काँग्रेसकडून माधुरी अविनाश शेजवळ, ठाकरे गटाकडून भाग्यश्री सुयोग सावकारी, लोकक्रांती सेना पक्षाकडून कल्याणी विठ्ठल आरणे तर अपक्ष म्हणून अनिता सुरेश आरणे, मेघना ज्ञानेश्वर खंडीझोड व सायली दिगंबर मोरे असे हे सात उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राहात्यात नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवार नशीब अजमावत आहेत. देवळालीमध्ये बहुरंगी लढतीचे चित्र आहे.

नेवाशात क्रांतिकारी शेतकरी पक्षा विरूध्द महायुतीत प्रमुख लढत होत आहे. याशिवाय पाच उमे‌द्वार निवडणूक रिंगणात आहेत. अजित पवार गटानेही आपला वेगळा उमेदवार उभा केला आहे. शेवगाव नगरपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी असलेल्या ११ जणांपैकी ५ जणांनी माघार घेतली असून नगरसेवकपदाच्या १३६ उमेदवारांपैकी ३६ जणांनी माघार घेतली आहे. आता नगराध्यक्षपदासाठी ६ तर नगरसेवकपदाच्या २४ जागांसाठी १०० उमेदवार रिंगणात राहिल्याने मोठी चुरस बघायला मिळणार आहे. येथे निवडणुक चौरंगी ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून विद्या लांडे, भाजपाकडून रत्नमाला फलके, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाकडून परविन एजाज काझी व शिवसेना
शिंदे गटाकडून माया मुंढे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.

श्रीगोंदा नगरपालिकेच्या मैदानात अखेरच्या क्षणी चार प्रमुख पक्षाचे पॅनल रिंगणात राहिले. भाजपने अखेरच्या वेळी इंद्रायणी पाचपुते याचा नगराध्यक्षपदाचा अर्ज मागे घेतला. सुनीता खेतमाळीस या भाजपच्या उमेदवार असणार आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून शुभांगी पोटे, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ज्योती खेडकर तर महाविकास आघाडीच्या गौरी भोस रिंगणात आहेत. बहुतांश प्रभागात देखील चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भारतीय जनता पक्षाचे अखेर पर्यंत दोन उमेदवार पैकी कोण असा प्रश्न होता पण इंद्रायणी पाचपुते यांची उमेदवारी मागे घेतल्याने सुनीता खेतमाळीस नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. येथे महाविकास आघाडी विरोधात महायुतीचे तीनही घटक पक्ष अशी होणारी लढत रंगतदार होणार आहे.

पाथर्डी नगरपरिषद निवडणुकीत शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण १४ उमेदवारांनी माघार घेतली. यात २ नगराध्यक्ष पदाचे तर १२ नगरसेवक पदाचे उमेदवारांचा समावेश असून यामुळे संपूर्ण निवडणूक समीकरणच बदलले आहे. विशेष म्हणजे शिवसेना (उध्दव ठाकरे गट) आता पूर्णपणे रिंगणाबाहेर गेली आहे. नगरसेवक पदाच्या २० जागांसाठी ६३ उमेदवार रिंगणात असून नगराध्यक्ष पदाच्या एकाच जागेसाठी चार उमेदवार उभे आहेत, परंतु नगराध्यक्ष पदाचा बाद न्यायालयात गेल्याने अंतिम चित्र २५ नोव्हेंबरला न्यायालयाच्या निर्णयानंतर स्पष्ट होणार आहे. भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट व राष्ट्रवादी शरद पवार गट या तिन्ही पक्षांनी सर्व जागांवर उमेदवार उभे केले असून तिरंगी लढत अटळ असल्याचे राजकीय परीस्थितीतून स्पष्ट होते.

जामखेडमध्ये सभापती शिंदे, आ. पवार यांची प्रतिष्ठा पणाला जामखेड नगरपरिषद निवडणूकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १३ नगराध्यक्षांपैकी ४ उमेदवारांनी माघार घेतली. तर १२० अर्ज भरलेल्या नगरसेवकांपैकी १८ उमेदवारांनी माघार घेतली. आता नगराध्यक्षपदाचे ९ उमेद्वार रिंगणात असल्याने नगराध्यक्ष पदासाठी मोठी चुरस पहायला मिळणार आहे. सभापती राम शिंदे, आ. रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. यामध्ये प्रामुख्याने नगराध्यक्षपदाचे भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात खरी लढत रंगणार आहे. जामखेड नगरपरिषद निवडणुक जाहीर होताच इच्छुकांच्या गर्दी दिवसागणिक वाढत गेली होती त्यानुसार नगराध्यक्ष पदाच्या १ जागेसाठी ९ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे वाढत्या थंडीतही राजकीय वातावरण तापले आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील पालिका निवडणुकीत अपील दाखल न केलेल्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची तारीख शुक्रवारी संपली. छाननीत पात्र ठरलेल्या नगरध्यपदाच्या १४६ पैकी ४४ जणांनी माघार घेतली आहे, तर सदस्यांसाठी १,६०३ पैकी ३२९ इच्छुकांनी माघार घेतली आहे. दाखल झालेल्या अपिलांवर २५ नोव्हेंबरपर्यंत सुनावणी घेऊन निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. यानंतर २६ नोव्हेंबर रोजी नगरपालिका निवडणूक शाखेकडून उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदाच्या ४० तर सदस्यपदाच्या ३०७ इच्छुकांनी माघार घेतली आहे.
पालिकानिहाय नगराध्यपदाच्या उमेदवारांची संख्या (कंसात सदस्य) पुढील प्रमाणे संगमनेर १० (१२३), श्रीरामपूर १३ (२०८), कोपरगाव १२ (१३६), शिर्डी ८ (७५), राहाता ८ (७८), देवळाली ६ (७१), राहुरी ७ (९०), पाथर्डी ५ (६२), श्रीगोंदा ५ (१०३), जामखेड १२ (११८), शेवगाव ६ (१३१), नेवासा १० (७९).

शिर्डीत भाजपच्या उमेदवाराची माघार, अपक्ष बिनविरोध

सत्ताधारी गटाचे व माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्या सुविद्य पत्नी मनीषा शिवाजी गोंदकर यांनी प्रभाग क्रमांक आठ मधून भाजपा पक्षाची अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केली होती. मात्र मनीषा गोंदकर यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार छायाताई पोपट शिंदे यांची शिर्डी नगर परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. याची केवळ औपचारिकता बाकी आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : पोलिसांच्या सतरा सेवा ‘ऑनलाईन’; ‘आपले सरकार’ पोर्टलवर सुविधा

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळबद्ध सेवा मिळाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या 'आपले सरकार' पोर्टलवर पोलिसांच्या गृह विभागास प्राधान्य...