Wednesday, December 4, 2024
Homeनगरऐन दिवाळीच्या दिवशी काळाचा घाला; कार-पिकपच्या अपघातात सेवानिवृत्त सैनिकाचा मृत्यू

ऐन दिवाळीच्या दिवशी काळाचा घाला; कार-पिकपच्या अपघातात सेवानिवृत्त सैनिकाचा मृत्यू

नेवासा तालुका | प्रतिनिधी
तालुक्यातील सौंदाळा येथे नेवासा-शेवगाव रोडवर झालेल्या कार व पिकपच्या अपघातात कुकाणा येथील सेवानिवृत्त सैनिक (मेजर) मच्छिन्द्र भाऊराव तांबे (वय 48 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. सदरची घटना दिवाळीच्या दिवशी शुक्रवार दि.1 नोव्हेंबर रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की, कुकाणा येथील मच्छिन्द्र भाऊराव तांबे (वय 48 वर्षे) हे भारतीय सेनादलातून निवृत्त होऊन सध्या अकोला तालुक्यातील आरोग्य विभागाच्या सेवेत कार्यरत होते. शुक्रवार दि.१ नोव्हेंबर रोजी दिवाळी करिता ते त्यांच्या मारुती कार मधून घरी येत होते. त्यावेळी सकाळी ५ वाजेच्या सुमारास सौंदाळा येथे त्यांची मारुती कार क्रमांक एमएच १७ सीएम ९८१८ व भेंड्याकडून नेवासाकडे जाणाऱ्या महेंद्रा पिकप क्रमांक एमएच एजी २९०९ ची समोर समोर धडक होऊन अपघात झाला. यात कार मधील मेजर तांबे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सकाळी ११ वाजेच्य दरम्यान कुकाणा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला. सेवानिवृत्त सैनिक संघटनेचे वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली.
त्यांच्या मागे पत्नी,एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या