Monday, November 23, 2026
Homeक्राईमCrime News : नगर-पाथर्डीत चैन स्नॅचिंग करणारी टोळी जेरबंद

Crime News : नगर-पाथर्डीत चैन स्नॅचिंग करणारी टोळी जेरबंद

चार गुन्ह्यांची उकल || सोन्याच्या दागिण्यांसह 3.26 लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरासह पाथर्डी परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळविणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात उघडकीस आली आहे. त्यातील दोघांना ताब्यात घेण्यात आले असून तिघे पसार आहेत. या कारवाईत चार चैनस्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी सोन्याचे दागिने, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण 3 लाख 26 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisement -

1 नोव्हेंबर रोजी केडगाव शिवारातील लिंक रोडकडून गायकेमळ्याकडे जाणार्‍या रस्त्यावर दोन महिला स्कुटीवरून जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील दागिने बळजबरीने हिसकावून नेले होते. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंत सालगुडे, अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, दीपक जाधव, फुरकान शेख, भगवान धुळे यांचे पथक या गुन्ह्यासह इतर चैनस्नॅचिंग गुन्ह्यांचा समांतर तपास करत होते.

पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. 21 नोव्हेंबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार, विनोद उर्फ जोल्या जिजाबा भोसले (वय 26, रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड) हा केडगाव परिसरात असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने त्याला केडगाव येथून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने साथीदार सुमित नितीन चव्हाण, रोहित नितीन चव्हाण (दोघे रा. केडगाव) आणि शुभम गहिनीनाथ भोसले (रा. बेलगाव, ता. कर्जत) यांच्या मदतीने चैनस्नॅचिंगचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी अधिक चौकशी केली असता या टोळीने पाथर्डी पोलीस ठाण्यातील एक आणि कोतवाली पोलीस ठाण्यातील आणखी दोन असे एकूण तीन गुन्हे केल्याचे उघड झाले. त्यामुळे या टोळीशी संबंधित चार गुन्ह्यांची उकल झाली आहे. चोरी केलेले काही दागिने विनोद भोसले याने अंबादास दगडू पांडुळे (वय 51, रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड) याला विक्रीसाठी दिल्याची माहिती तपासात समोर आली. त्यानुसार पोलिसांनी पांडुळे याचाही शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 18 ग्रॅमचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. या प्रकरणातील सुमित चव्हाण, रोहित चव्हाण आणि शुभम भोसले हे तिघे पसार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह कोतवाली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Crime News : खरेदीच्या बहाण्याने आले अन् अडीच तोळ्याचे गंठण हिसकावून...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar किराणा खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या दोघा चोरट्यांनी दुकानदार महिलेच्या गळ्यातील सुमारे अडीच तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना बोल्हेगाव...