Friday, January 23, 2026
HomeनगरAhilyanagar : अंमलदारांच्या ‘हुजरेगिरी’च्या विरोधात ‘घार्गे-कबाडी’ टेस्ट!

Ahilyanagar : अंमलदारांच्या ‘हुजरेगिरी’च्या विरोधात ‘घार्गे-कबाडी’ टेस्ट!

पूर्वी एलसीबी केलेल्या अंमलदारांची पुन्हा एन्ट्री ? || वरिष्ठांचे कसब आणि निर्णय कसोटीवर

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) प्रभारीपदी जळगाव येथून अहिल्यानगर जिल्ह्यात बदलून आलेले पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी बाजी मारली. त्यांनी पदभार हाती घेत कामाला सुरूवात केली. मात्र त्यांच्यासमोर आव्हान असेल एलसीबीतील ठराविक अंमलदारांची मक्तेदारी मोडीत काढण्याचे. त्यांना हे काम आधी करावे लागेत. पाच वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण करूनही काही अंमलदार एलसीबीमध्येच स्थिरावले आहेत. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल. तर दुसरीकडे याआधी एलसीबी करून गेलेल्या व कायमच वादग्रस्त ठरत असलेल्या पोलीस अंमलदारांची पुन्हा एलसीबीत येण्यासाठी ‘तडफड’ सुरू झाली आहे.

- Advertisement -

त्यासाठी त्यांनी कबाडी यांच्यासह पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची ‘हुजरेगिरी’ करण्याचे काम हाती घेतले आहे. ते जर आले तर नवे-जुने वाद निर्माण होऊन कामाला खोडा बसू शकतो. त्यामुळे कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता, फक्त अनुभव आणि क्षमतेच्या आधारावर एलसीबीमध्ये नवीन नेमणुका कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एलसीबी केलेल्या अंमलदारांना पुन्हा संधी न देता पोलीस ठाणे स्तरावर चांगले काम करणार्‍या अंमलदारांना एलसीबीत संधी दिली जाईल अशी आशा अधीक्षक घार्गे यांच्याकडून आहे.

YouTube video player

पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या कार्यकाळात गंभीर गुन्ह्यांचा छडा लावून अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या, मात्र काही प्रकरणात एलसीबी वादग्रस्त ठरली. निरीक्षक आहेर यांच्या सोबत असलेली टीम जावून नवीन टीम एलसीबीत दाखल होणार आहे. मुळ एलसीबीत हाताच्या बोटावर मोजण्या इतके देखील अंमलदार कार्यरत राहिलेले नाही. यामुळे एलसीबीत मुळ नेमणुका देण्याची वेळ अधीक्षक घार्गे यांच्यावर आली आहे. जिल्ह्यात गुन्हेगारीने उंबरठा ओलांडला असताना, एलसीबी या सर्वांत प्रभावशाली तपास यंत्रणेचा दबदबा कुठेतरी कमी होत चालल्याचे दिसत आहे. एकिकडे अवैध धंद्यावर अधीक्षक घार्गे यांनी पथकामार्फत वचक निर्माण केला आहे. मात्र जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारांना आळा घालणे, घडलेल्या गुन्ह्यांची जलद उकल करण्याचे काम कबाडी यांना हाती घ्यावे लागणार आहे. त्यासाठी त्यांना चांगली टिम लागेल यात शंका नाही.

निरीक्षक आहेर यांच्या काळात सायबर पोलीस ठाण्यातील अंमलदार एलसीबीसाठी काम करत आहे. तसेच उत्तर व दक्षिण जिल्ह्यासाठी पथक स्थापन करण्यात आले होते. त्या पथकातील अंमलदार देखील एलसीबीत काम करत आहे. पोलीस अधीक्षक घार्गे यांनी बदली केलेल्या अंमलदारांना देखील अद्याप कार्यमुक्त करण्यात आले नाही. आता हा सर्व प्रकार मोडीत काढण्यात येणार असून नवीन अंमलदारांची एलसीबीसाठी नियुक्त केली जाणार असल्याचे समजते. मात्र नवीन अंमलदार नियुक्त करत असताना यापूर्वी ज्यांनी एलसीबी केली आहे व एलसीबीत असताना वादग्रस्त ठरले आहे. वर्षांनुवर्ष एलसीबीत राहण्यासाठी ‘तडफड’ करणार्‍यांनी पुन्हा एलसीबीत वर्णी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आपली नियुक्ती एलसीबीत होणार अशी ‘दवंडी’ ते गावभर देत आहे.

तसेच सध्या या ना त्या मार्गाने एलसीबीत असलेल्या काही अंमलदारांचा पुन्हा तेथे राहण्यासाठी आटापिटा सुरू आहे. मात्र अधीक्षक घार्गे यांचा स्वभाव पाहता ते काम करणार्‍या अंमलदारांना एलसीबीसाठी संधी देखील असे दिसते. मात्र काम करणार्‍यांमध्ये त्यांनी पोलीस ठाणे स्तरावर चांगले काम केलेल्या अंमलदारांची पारख करून त्यांची निवड एलसीबीसाठी करावी, मात्र ते करत असताना त्या अंमलदाराने याआधी एलसीबी केली नाही ना, याचाही देखील विचार करावा, नाहीतर पुन्हा तेच त्या अंमलदारांची ‘मक्तेदारी’ एलसीबीत राहिल आणि पुन्हा एलसीबी बदनाम होईल यात शंका नाही.

एलसीबीची जुनी टिम पुन्हा सक्रिय
स्थानिक गुन्हे शाखेत वर्षांनुवर्ष ठाण मांडून असलेल्या अंमलदारांनी पुन्हा येथेच थांबण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. तर काही अंमलदारांनी पूर्वी एलसीबी केली आहे व आता पुन्हा एलसीबीत येण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. त्यांचा प्रमुख अंमलदार आणि त्याचे साथीदार सक्रिय झाले आहे. ते अधीक्षक घार्गे यांनी स्थापन केलेल्या पथकात देखील कार्यरत आहे. आता एलसीबीत असणारे काही अंमलदार आणि एलसीबी केलेले आणि पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांनी अधीक्षक घार्गे यांच्यासह निरीक्षक कबाडी यांची ‘हुजेरीगिरी’ सुरू केली आहे. असे अंमलदार ‘डिटेक्शन’साठी कामाचे नुसून ते फक्त काम करत असल्याचा आव आणतात. मात्र वरिष्ठांनी अशा अंमलदारांना बाजूला करून काम करणार्‍यांना संधी दिली पाहिले. तरच एलसीबीचा दबदबा टिकून राहिल.

घार्गे यांच्या भोवतीचा सर्कस चर्चेत
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याभोवती सतत वावरणार्‍या काही अंमलदारांचा सर्कस पोलीस दलात चांगलाच चर्चेत आला आहे. त्या अंमलदारांना डिटेक्शन कामात अनुभवच नाही. तरीही मी ‘एलसीबीसाठी योग्य’ असा दावा करत ते नियुक्ती मिळवण्यासाठी जोखीम घेत आहेत. आमचीच नेमणूक होणार अशी चर्चा त्यांच्याकडून स्वत:च पोलीस दलात पेरली जात आहे. जर अशा अकार्यक्षम अंमलदारांची एलसीबीमध्ये नियुक्ती झाली, तर एलसीबीचा दर्जा आणि जनविश्वास पुन्हा संकटात येईल. अधीक्षक घार्गे यांची पारख पाहता ते वादग्रस्त, अनुभव नसणार्‍या व कायमच एलसीबीसाठी आग्रही असणार्‍यांना पुन्हा संधी देतील असे वाटत नाही. त्यांनी तसे केले तर त्यांना पोलिसांसह नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

ताज्या बातम्या

राज

Raj Thackeray: “आज निष्ठा सहज विकल्या जातात, तत्व सहज…”; राज ठाकरेंकडून...

0
मुंबई | Mumbaiशिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज १००वी जयंती आहे. आजपासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरवात होत आहे. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेसह राज्यभरात...