Tuesday, January 6, 2026
HomeनगरAhilyanagar : नगर दक्षिणेतील नगरपरिषदांचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

Ahilyanagar : नगर दक्षिणेतील नगरपरिषदांचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध || सत्तेसाठी व्यूहरचनेसह राजकीय खलबते सुरू || निवडणुकीची रंगणार रणधुमाळी

जामखेडमधील 24 जागांसाठी सोडत

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी नगरसेवक पदाच्या 24 जागांसाठी बुधवारी(दि.8) प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. पिठासन अधिकारी तथा कर्जतचे प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी अजय साळवे उपस्थित होते. प्राथमिक शाळेचे विद्यार्थी श्रेयश सागर व्यवहारे, साई प्रमोद टेकाळे व मोक्षदा मयुर पुजारी या विद्यार्थांच्या हस्ते सोडत काढण्यात आली.

- Advertisement -

प्रभागनिहाय आरक्षण :
प्रभाग क्रमांक 1 मध्ये जागा क्रमांक (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व जागा क्रमांक (ब) मध्ये, सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 2 मध्ये जागा क्रमांक (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग व जागा क्रमांक (ब) मध्ये सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 3 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व जागा क्रमांक (ब) मध्ये सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 4 मध्ये जागा क्रमांक (अ) अनुसूचित जाती व जागा क्रमांक (ब) मध्ये सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 5 मध्ये जागा क्रमांक (अ) अनु जमाती व जागा क्रमांक (ब) मध्ये सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 6 मध्ये जागा क्रमांक (अ) अनुसूचित जाती महिला व जागा क्रमांक (ब) मध्ये सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 7 मध्ये जागा क्रमांक (अ) सर्वसाधारण महिला व जागा क्रमांक (ब) मध्ये सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 8 मध्ये जागा क्रमांक (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व जागा क्रमांक (ब) मध्ये सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 9 मध्ये जागा क्रमांक (अ) सर्वसाधारण महिला व जागा क्रमांक (ब) मध्ये सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 10 मध्ये जागा क्रमांक (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व जागा क्रमांक (ब) मध्ये सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 11 मध्ये जागा क्रमांक (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग व जागा क्रमांक (ब) मध्ये सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 12 मध्ये जागा क्रमांक (अ) अनुसूचित जाती महिला व जागा क्रमांक (ब) मध्ये सर्वसाधारण. हरकतींसाठी 13 ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे.

YouTube video player

शेवगावमध्ये महिलांचा वरचष्मा

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव नगरपरिषदेची प्रभागनिहाय आरक्षण सोडत बुधवारी (दि. 8) जाहीर करण्यात आली. शहरातील एकूण 12 प्रभागातील 24 जागांपैकी 12 जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. नगराध्यक्षपदासह 12 जागांवर महिलांचा वरचष्मा राहणार आहे. यामुळे पुरुष उमेदवारांच्या हाती सत्तेची चावी येईल या स्वप्नाला ब्रेक लागले आहे. मात्र अनेक इच्छुकांना हक्काच्या प्रभागामध्ये लढता येणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे.

इतर मागास प्रवर्गासाठी दोन, अनुसूचित जातीसाठी तीन तर सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी सात अशा एकूण 12 जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. शेवगाव येथील तहसिल कार्यालयात बुधवारी (दि. 8) सकाळी 11 वाजता निवडणूक नियंत्रण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी व मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्या उपस्थितीत शेवगाव नगरपरिषदेची प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये 12 प्रभागांपैकी लोकसंख्येच्या तुलनेत अनुसूचित जातीची लोकसंख्या 5 हजार 845 इतकी असून चार प्रभागांमध्ये ती संख्या जास्त असल्याने प्रभाग क्रमांक 1, 5, 9 व 10 आरक्षित करण्यात आले.

तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक 2, 3, 4, 6, 8, 12 हे आरक्षित करण्यात आले. प्रभाग 7 व 11 या दोन जागा सर्वसाधारणसाठी आरक्षित करण्यात आल्या. उर्वरित प्रभागातील 12 जागा सर्वसाधारण असून त्यापैकी 6 जागांवर सर्वसाधारण महिलांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामुळे 12 प्रभागातील 24 जागांपैकी 12 जागांवर महिलांना निवडणूक लढविण्याची संधी मिळाली. त्यामुळे आगामी निवडणुकीत शेवगाव नगरपरिषदेवर नगराध्यक्षासह महिलाराज येणार आहे.

जोया आतार, आराध्या गरडवाल, जावेरिया पठाण, अर्विता नांगरे, समिक्षा मगर या विद्यार्थ्यांनी चिठ्ठीद्वारे आरक्षण सोडत काढली. आरक्षण सोडतीसाठी नगरपरिषदेचे कार्यालय अधीक्षक सुनिल पगारे, सहाय्यक करनिरीक्षक अच्युत नीळ, जगदीश जाधवर, केतन मुरदारे, अर्जुन बर्गे, सुग्रीव फुंदे, संजय साखरे, सागर सुरवसे आदींनी मदत केली.

प्रभागानिहाय आरक्षण :
प्रभाग क्रमांक 1: अ) अनुसूचित जाती सर्वसाधारण, ब) सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 2: अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब) सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 3: अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब) सर्वसाधारण महिला.प्रभाग क्रमांक 4: अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब) सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 5: अ) अनुसूचित जाती सर्वसाधारण, ब) सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 6: अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब) सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 7: अ) सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 8: अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब) सर्वसाधारण महिला. प्रभाग क्रमांक 9: अ) अनुसूचित जाती महिला, ब) सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 10: अ) अनुसूचित जाती महिला, ब) सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 11: अ) सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 12: अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब) सर्वसाधारण.

श्रीगोेंदा पालिकेत महिलांसाठी 11 जागा

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा पालिकेचे प्रभागानिहाय आरक्षण जाहीर झाले. 22 पैकी सर्वसाधारण महिला आणि पुरुषांसाठी 13 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 6 जागा, आणि अनुसूचित जातीसाठी 3 जागा आहेत. सर्व प्रवर्ग मिळून 11 जागा महिलांसाठी राखीव आहेत.

प्रभागनिहाय आरक्षण :
प्रभाग एकमध्ये सर्वसाधारण महिला आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण),प्रभाग दोनमध्ये सर्वसाधारण महिला आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण), प्रभाग तीनमध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण खुला, प्रभाग चारमध्ये अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण खुला, प्रभाग पाचमध्ये सर्वसाधारण महिला आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण), प्रभाग सहामध्ये सर्वसाधारण महिला आणि अनुसूचित जाती (सर्वसाधारण), भाग सातमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण खुला, प्रभाग आठमध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण खुला, प्रभाग नऊमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण खुला, प्रभाग दहामध्ये अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण खुला, प्रभाग अकरामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण खुला प्रवर्ग असे आरक्षण झाले आहे. याचबरोबर, प्रभागानिहाय मतदार यादी कार्यक्रम देखील सुरू झाला आहे.

पाथर्डीत यंदा 17 ऐवजी 20 नगरसेवक

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

आगामी काळात होणार्‍या पालिका निवडणुकीतील नगरसेवकांचे प्रभागनिहाय आरक्षण बुधवारी (दि.8) काढण्यात आले. या आरक्षणामध्ये जवळपास सर्वच जुन्या चेहर्‍यांना परत एकदा सभागृहात जाण्याची संधी मिळण्याची शक्यता असून नव्या पालिकेत जाऊ इच्छिणार्‍या नवीन उमेदवारांमध्ये सुद्धा खुशीचा माहोल दिसून येत आहे.

बुधवारी सकाळी पालिका कार्यालयात प्रांताधिकारी प्रसाद मते व मुख्याधिकारी संतोष लांडगे,निवडणूक प्रमुख विशाल डहाळे, सहायक नगर रचनाकार नरेंद्र तेलोरे,विजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव यांच्या उपस्थितीत दोन लहान मुलींच्या हस्ते चिठ्या टाकून सोडत काढण्यात आली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, चंद्रकांत भापकर, डॉ. सुहास उरणकर, हुमायून आतार, अण्णा हरेर, भैय्या इजारे, रोहित पुंड, आकाश काळोखे, बबलू वावरे, राहुल ढाकणे, गणेश आंधळे, किरण दहिफळे, रावसाहेब कंठाळे आदी उपस्थित होते.

पालिकेच्या मागील सभागृहात एकूण 17 नगरसेवक होते. यावेळी ही संख्या वाढून 20 झाली आहे. एकूण 10 प्रभागातून प्रत्येकी दोन असे 20 नगरसेवक निवडून द्यायचे असून या पैकी दहा महिला नगरसेविका असणार आहेत.

प्रभागनिहाय आरक्षण –
प्रभाग क्रमांक एक अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब) सर्वसाधारण खुला, प्रभाग क्रमांक दोन अ) अनुसूचित जाती सर्वसाधारण, ब) सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक तीन अ) सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण खुला, प्रभाग क्रमांक चार अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब) सर्वसाधारण खुला प्रभाग क्रमांक पाच अ) सर्व साधारण महिला, ब) खुला सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक सहा अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब) सर्वसाधारण खुला, प्रभाग क्रमांक सात अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण ब) सर्व साधारण महिला, प्रभाग क्रमांक आठ अ) अनुसूचित जाती महिला ब) सर्वसाधारण खुला, प्रभाग क्रमांक नऊ अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण ब) सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक दहा अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण खुला.

ताज्या बातम्या

सोनिया

काँग्रेस खासदार सोनिया गांधींची तब्येत अचानक बिघडली; रुग्णालयात दाखल

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiकाँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी त्यांची...