Wednesday, June 10, 2026
Homeक्राईमAhilyanagar : अहिल्यानगरमध्ये गव्हाचा काळाबाजार उघड

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये गव्हाचा काळाबाजार उघड

दोन ट्रक पकडल्या || 42.78 लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशाने येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (16 मे) रात्री कारवाई करत गव्हाची साठवण करून काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री करण्यासाठी वाहतूक करणारे दोन मालवाहू ट्रक पकडले. या कारवाईत सुमारे सात लाख 77 हजार रूपये किमतीच्या गव्हासह एकूण 42 लाख 78 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील उदयन राजे हॉटेलजवळील पार्किंग परिसरात करण्यात आली.

- Advertisement -

दरम्यान, यासंदर्भात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गव्हाचा मोठा साठा काळ्या बाजारात विक्रीसाठी वाहतूक केला जाणार असल्याची माहिती अधीक्षक सुदर्शन यांना मिळाली होती. त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख अंमलदार आप्पा डमाळे, नगरे, नियाज शेख यांच्या पथकाने कारवाईचे नियोजन केले. पथकाने दोन पंचांसमक्ष उदयन राजे हॉटेल परिसरातून संशयित दोन ट्रक ताब्यात घेतल्या. त्यांची तपासणी केली असता दोन्ही ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गव्हाच्या गोण्या भरलेल्या आढळल्या.

पोलिसांनी चालकांची चौकशी केली असता पहिल्या ट्रकच्या (एमएच 06 एसी 0108) चालकाने गहू केकसी येथून भरून सणसवाडी येथे नेण्यासाठी निघाल्याचे सांगितले. मात्र संबंधित माल रद्द झाल्याने अहिल्यानगरमधील अंकित नावाच्या व्यक्तीकडे माल पोहोचविण्यासाठी आलो असल्याची माहिती त्याने दिली. दुसर्‍या ट्रकच्या (एमपी 46 झेडई 5251) चालकाने गहू अहिल्यानगर मार्केटयार्डातून भरून सातारा येथील एका फ्लोअर मिलला घेऊन जात असल्याचे सांगितले.

मात्र दोन्ही वाहनांतील मालाबाबत संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी वाहनांसह चालकांना ताब्यात घेतले. ट्रक एमएच 06 एसी 0108 मध्ये 18 हजार 895 किलो गहू आढळून आला. या गव्हाची किंमत 3 लाख 77 हजार 900 रूपये आहे. तर ट्रक एमपी 46 झेडई 5251 मध्ये 20 हजार 640 किलो गहू आढळला. त्याची किंमत चार लाख 12 हजार 800 रूपये आहे.

गहू रेशनिंगचा असण्याची शक्यता
दरम्यान, सदरचा गहू रेशनिंगचा आहे का, याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी पुरवठा विभागाला पत्र दिले आहे. या चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र, सदरचा गहू रेशनिंगचाच असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला नसला, तरी तो दाखल होऊ नये यासाठी दबाव आणला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येथील एका शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलिसाच्या आशीर्वादाने रेशनिंगचा गहू काळ्या बाजारात विकला जात असल्याची चर्चा पोलीस दलात सुरू आहे. या प्रकरणाची दखल अधीक्षक मुम्मका सुदर्शन घेणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : तुकाराम मुंढेंचा झंझावात आता शिर्डीत!

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरोधात धडक कारवाया सुरू केली असल्याने या झंझावाताचे लोण...