Thursday, April 30, 2026
HomeनगरAhilyanagar : बिकट वाट असणारी गावे ठरणार ‘अवघड’

Ahilyanagar : बिकट वाट असणारी गावे ठरणार ‘अवघड’

झेडपीने स्थानिक पातळीवरून दळणवळणाचा स्पष्ट अहवाल मागवला

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

उन्हाळा जवळ आला की विद्यार्थ्यांना सुट्ट्यांची तर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना बदल्याची ओढ लागतेे. गेल्या काही वर्षापासून निवडणूकांसह अन्य कारणामुळे शिक्षकांच्या नियमित बदल्यांना खो अथवा त्या उशीराने होतांना दिसत आहेत. यंदा मात्र गुरूजींच्या बदल्या वेळेत होणार असल्याने त्यादृष्टीने शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. या बदल्यामध्ये महत्वाचा विषय असणारी अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित करण्यासाठी संबंधीत गावातील दळणवळणाची सुविधा याबाबत जिल्हा परिषद प्रशासाने स्थानिक पातळीवरून स्पष्ट अहवाल मागवला आहे. ज्या गावात जाण्याची वाट बिकट अशा गावातील शाळांची अवघड क्षेत्रातील शाळा म्हणून घोषणा करण्यात येणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, गटविकास अधिकारी यांच्या प्राथमिक अहवालानूसार जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 384 शाळांची अवघड शाळांच्या यादीत निवड केली आहे. मात्र, ही यादी अंतिम करण्यापूर्वी अवघड शाळांच्या निवडीसाठी असणार्‍या सात निकषांपैकी तीन निकष पूर्ण करणार्‍या आणि त्यातही संबंधीत गावातील दळवळणाची सोय याबाबत स्थानिक पातळीवर खात्री करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी काढले आहेत. या आदेशात ज्या गावात जाण्यासाठी वाहतुकीच्या सुविधांचा अभाव असने, संबंधीत गाव वाहतूक योग्य रस्त्यांनी जोडलेले नसने, संबंधीत गावात शासकीय वाहतूक सुविधा नसणे याबाबतचा अहवाल आरटीओ कार्यालयाकडून घेण्यासोबत स्थानिक पातळीवर जावून गट विकास अधिकारी यांनी खात्री करून संबंधीत गावे अवघड क्षेत्रातील गावाच्या यादीत टाकण्यात यावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आलेले आहे.

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पारनेर तालुक्यातील 26, जामखेडमधील 6, राहुरीतील 14, पाथर्डी 20, अकोले 216, शेवगाव 2, संगमनेर 93, कर्जत 4, नेवासा 1 अशा 384 गावांचा अवघड क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. या गावांची यादी गट विकास अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा परिषद शिक्षण विभागाला पाठवण्यात आलेली असून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणार्‍या समिती मार्फत जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळांची यादी अंतिम करण्यात येणार आहेत. अवघड क्षेत्रातील गावे असणार्‍या शाळांवरील प्राथमिक शिक्षकांना बदलीत सुट आहे.

अवघड असतांना काही शाळा सुटल्या
जिल्ह्यात अनेक तालुक्यात प्रशासनाच्या चुकीमुळे अनेक शाळांना जाण्यासाठी रस्ते नाहीत. असे असतांना त्या शाळांची निवड अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये होणे अपेक्षीत असतांना ती झालेली नाही. अशा शाळांवर गेल्यावर्षीच्या बदल्यामध्ये महिला शिक्षकांची बदली झालेली असून आता त्या ठिकाणी जाणे अवघड झाले असल्याने केवळ प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शिक्षकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे यंदा प्रशासनाने खात्री करून एकही अवघड क्षेत्रातील शाळा सुटणार नाहीत, याची खात्री करून अवघड क्षेत्राची यादी जाहीर करण्याची मागणी होत आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : भंडारदराच्या पाणी चोरीवर उच्च न्यायालयाचा दणका

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur भंडारदरा धरणाच्या पाणी वाटपात होणारी प्रचंड चोरी आणि नादुरुस्त मोजमाप यंत्रणेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनाला कठोर शब्दांत फटकारले आहे....