Wednesday, June 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूज‘राष्ट्र प्रथम’च्या तत्वावर देशाचा विकास; विकसित भारतासाठी आणखी वेगाने काम करू –...

‘राष्ट्र प्रथम’च्या तत्वावर देशाचा विकास; विकसित भारतासाठी आणखी वेगाने काम करू – पंतप्रधान नरेंद्र मोदी

१२ वर्षांच्या कामगिरीचा आढावा, विकसित भारताचा संकल्प पुन्हा व्यक्त

- Advertisement -

नवी दिल्ली | वृत्तसंस्था New Delhi

पंतप्रधा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात एनडीएला सत्तेत येऊन आज 12 वर्षे पूर्ण झाली. मोदी यांच्या सत्तेला एकूण 4399 दिवस झाले आहेत. दरम्यान, एनडीए सरकारच्या या घोडदौडीच्या निमित्ताने राजधानी दिल्लीत एनडीएच्या घटकपक्षांची परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला. या परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले.

परिषदेला एनडीएतील विविध घटक पक्षांचे प्रमुख नेते, केंद्रीय मंत्री, खासदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विविध क्षेत्रांत केलेली प्रगती, पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ, डिजिटल क्रांती, आर्थिक सुधारणा आणि भारताची जागतिक स्तरावरील वाढती प्रतिष्ठा यांचा गौरव करण्यात आला.

केंद्र सरकारच्या गेल्या १२ वर्षांच्या कारभाराचा आढावा घेतला. देशाच्या विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजना, पायाभूत सुविधा, डिजिटल क्रांती, महिला सक्षमीकरण आणि शेतकरी कल्याण यांचा उल्लेख करत त्यांनी “विकसित भारत” घडविण्याचा संकल्प पुन्हा व्यक्त केला.

पंतप्रधान म्हणाले की, गेल्या १२ वर्षांत सरकारने “राष्ट्र प्रथम” या भावनेने काम केले असून गरीब, शेतकरी, महिला आणि युवकांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य दिले आहे. देशातील पायाभूत सुविधांचा विस्तार, डिजिटल व्यवहारांमध्ये झालेली वाढ, घरकुल, जलजीवन मिशन आणि विविध कल्याणकारी योजनांमुळे भारताची जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी पीएम-किसान योजनेअंतर्गत लाखो कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आल्याचे सांगितले. तसेच पीकविमा योजना, किसान क्रेडिट कार्ड आणि ग्रामीण विकासाच्या विविध उपक्रमांचा उल्लेख केला. युवकांसाठी कौशल्य विकास, स्टार्टअप संस्कृती आणि रोजगारनिर्मितीवर सरकारचा भर कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

देशाला संबोधित करताना त्यांनी आगामी काळात भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. “जनतेचा विश्वास आणि देशहिताचा विचार करून विकासाचा प्रवास अधिक वेगाने पुढे नेला जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.

ताज्या बातम्या

२५ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

0
येवला | प्रतिनिधी एका २५ वर्षीय विवाहितेने शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील वाघाळे येथे घडली. या प्रकरणी पती, सासरे आणि सासू...