Thursday, July 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजविधानपरिषद निवडणूक : अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांचा महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे...

विधानपरिषद निवडणूक : अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांचा महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा?

राजकीय घडामोडींना वेग ; उद्या घोषणा होण्याची शक्यता

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिकमध्ये होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (िद.१०) मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी अखेर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी झालेल्या चर्चे नंतर हा निर्णय झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

नाशिक विधान परीषद निवडणुकीत गोकुळ गीते यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ते कोणत्या बाजूने झुकतात यावर निवडणुकीचे गणित बदलण्याची शक्यता होती. गेल्या काही दिवसांत भाजप आणि महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, महत्त्वाच्या बैठका आणि वरिष्ठ नेत्यांचे संपर्क यामुळे या चर्चेला वेग आला होता. या चर्चांमध्ये त्यांना महायुतीत कायम ठेवण्यासाठी आणि पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न झाले होते. गीते यांनी महायुती उमेदवाराला पाठिंबा दिल्याने नरेंद्र दराडे यांची निवडणुकीतील ताकद वाढणार आहे. बैठकीस संकटमोचक मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सांमत , मनपा स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते, गोकुळ गिते, निलेश बोरा, ज्ञानेश्वर गामणे आदी उपस्थित हाेते.

दराडे यांचे स्वप्न पुर्ण होणार
नरेंद्र दराडे यांना आता िवजयाचा मार्ग सुकर झाला आहे. ते दुसऱ्यांदा विधानपरीषदेत पोहोचणार आहे. त्यांचे बंधु किशेार दराडे यांनी देखील शिक्षक मतदार संघात सलग दुऱ्यांदा बाजी मारली होती. एका कुटुबातून सलग दोनदा आमदार होण्याच्या घटना महाराष्ट्रात दुर्मीळ असून, त्यातील ही एक घटना असल्याचे बोलले जात आहेत.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातील साठा ‘किती’ टक्क्यांवर; मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल...