Thursday, May 2, 2024
Homeनगरचांदबिबी महाल परिसरात पुन्हा आला बिबट्या!

चांदबिबी महाल परिसरात पुन्हा आला बिबट्या!

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर शहराजवळील चांदबिबी महाल परिसरातून दिसेनासा झालेला बिबट्या आज मंगळवारी पुन्हा तेथे दिसला. सुनील माळवदे यांच्या गाडीला बिबट्या आडवा गेल्याने पर्यटकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काही महिन्यांपूर्वी महालच्या परिसरात दोन बिबटे दिसल्याने या भागात भीतीचे वातावरण होते. वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे, व्याघ्र संरक्षण प्राधिकरणचे सदस्य व निसर्गमित्र मंदार साबळे व वनविभागाची पूर्ण टीम बिबट्याच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेऊन होती. महाल परिसरात पर्यटकांना फिरण्यास काही काळ मनाई करण्यात आली होती. गेल्या दोन ते तीन महिन्यात इथे पुन्हा बिबट्या दिसला नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.

- Advertisement -

मात्र आज मंगळवारी सकाळी मात्र महालच्या रस्त्यावर पुन्हा काही जणांना बिबट्या दिसला. या भागात फिरायला जाणारे नगर मधील सुनील माळवदे यांच्या गाडीला बिबट्या आडवा पळाला. माळवदे यांनी तात्काळ मंदार साबळे यांना या संदर्भात कळविले. साबळे यांनी जिल्हा उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे यांना तशी माहिती दिली. उन्हाळ्यामुळे सध्या गवत वाळलेले असून पानगळही झालेली आहे त्यात बिबट्याचा रंग परिसराशी खूप मिळता जुळता असल्याने झाडीत लपलेला असला तर तो चटकन नजरेस पडत नाही त्यामुळे आडवटेला कोणी जाऊ नये असे आवाहन साबळे यांन केले आहे.

  • बिबट्याचा या भागात वावर असला तरी त्याचा उपद्रव मात्र नाही. पण तरीही या भागात फिरायला जाणार्‍या नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. – सुनील थेटे, वनपरिक्षेत्र अधिकारी, नगर

- Advertisment -

ताज्या बातम्या