Thursday, May 2, 2024
Homeनगरदस्तुरखुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हारच्या बाजारपेठेत मारला राउंड

दस्तुरखुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हारच्या बाजारपेठेत मारला राउंड

कोल्हार | वार्ताहर

दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्वतः पायी फिरून कोल्हार भगवतीपूरच्या बाजारपेठेत राउंड मारला. यात विनामास्क दुकानचालकांवर त्यांनी थेट कार्यवाही केली. तीन दुकाने सात दिवसांसाठी सील केली व ही दुकाने उघडण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच येथील आरोग्य केंद्रास भेट देऊन करोना स्थितीचा आढावा घेतला.

- Advertisement -

अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले स्वतः येथील बाजारपेठेत अवतरतील असे कुणाला स्वप्नातदेखील वाटले नसावे. ते शिर्डीकडे जात असताना अचानक कोल्हार भगवतीपूरमध्ये भेट दिली. त्यांच्या गाड्यांचा ताफा कोल्हार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उभा करून त्यांनी थेट स्व. माधवराव खर्डे पा. चौकातील बाजारपेठेत राउंड मारला.

येथील काही दुकानांमध्ये असलेली गर्दी पाहून ते आवाक झाले. ग्राहकांच्या तोंडाला मास्क नाही. सोशल डिस्टन्ससिंगचा पूर्णतः फज्जा उडालेला त्यांनी प्रत्यक्ष पहिला. अधिकाऱ्यांसोबत गाड्यांचा ताफा नसल्यामुळे ग्राहक असतील असे समजून दुकानदार व ग्राहक बिनदिक्कतपणे तोंडाला मास्क न लावता निर्धास्त होते. त्यांनी तत्काळ येथील तीन दुकान चालकांवर कारवाईचा बडगा उचलला. ही दुकाने सील केली.

व्यवसायिकांनी सोशल डिस्टन्ससिंग ठेवून विनामास्क येणाऱ्या ग्राहकाला दुकानात प्रवेश देऊ नये. तसेच ग्राहक आणि दुकान मालकात ४ फुटाचे अंतर ठेवून व्यवसाय करावा अशा सूचना त्यांनी व्यावसायिकांना दिल्या. लॉकडाऊन जर नको असेल तर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा अन्यथा त्या दुकान चालकावर कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या