Sunday, May 5, 2024
Homeनगरभरदुपारी बंद घर फोडणारा अटकेत

भरदुपारी बंद घर फोडणारा अटकेत

अहमदनगर (प्रतिनिधी)

सावेडी उपनगरातील तपोवन रोडवरील समर्थनगरमध्ये राहत असलेले नवनाथ आनंदा काळे (वय 37) यांचे बंद घर भरदुपारी फोडून सुमारे साडे सहा तोळ्याचे सोन्याचे दागिने व 50 हजार रूपये रोख रक्कम असा तीन लाख सहा हजारांचा मुद्देमाल चोरणार्‍याला तोफखाना पोलिसांनी तपोवन परिसरातून ताब्यात घेत अटक केली आहे.

- Advertisement -

राहुल मोहन फाटक (वय 20 रा. कांबी ता. शेवगाव) असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. त्याने चोरीची कबूली दिली असून त्याच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व एक दुचाकी असा तीन लाख 67 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

बुधवारी सकाळी नवनाथ काळे यांची दोन मुले शाळेत तर त्यांच्या पत्नी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. नवनाथ देखील घराला कुलूप लावून त्यांच्या पंक्चर दुकानात गेले होते. त्यानंतर चोरट्याने घरफोडून ऐवज लंपास केला होता.

पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर अधीक्षक प्रशांत खैरे, नगर शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, उपनिरीक्षक समाधान सोळुंके, अंमलदार दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, संदीप धामणे, सुरज वाबळे, अविनाश वाकचौरे, वसिम पठाण, अहमद इनामदार, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, सतिष भवर, सतिष त्रिभुवन, सचिन जगताप, गौतम सातपुते, चेतन मोहिते यांच्या पथकाने सदरची कामगिरी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या