Thursday, May 14, 2026
Homeनगरचाकूने वार करून वृध्दाचा खून; एक जखमी

चाकूने वार करून वृध्दाचा खून; एक जखमी

अहमदनगर | प्रतिनिधी

किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एकाने दोघा वृध्दावर चाकूने हल्ला केला त्यात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे.

- Advertisement -

भानुदास यादव मिसाळ (वय ७१ रा. सारसनगर) असे मयत वृध्दाचे नाव आहे. लहू सुखदेव सानप (वय ६५ रा. शिवाजीनगर, जामखेड) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा : लव्ह मॅरेजला मदत केली म्हणून तरुणाला मारहाण

आज सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मुलगीर, पोलीस अंमलदार संदीप घोडके, दीपक शिंदे, रवी टकले यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हल्ला करणारा संशयित आरोपी अशोक घोलप पसार झाला होता. पोलिसांनी त्याला दोन तासात ताब्यात घेतले. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हे ही वाचा : अकोलेच्या भाजप नगरसेवकावर पोक्सोचा गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

Ashok Kharat Case : तेरा हजार व्हिडिओ डिलीट; SIT कडून दोन...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आणि भक्तांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या स्वयंघोषित अशोक खरात (Ashok Kharat) याच्या...