Sunday, June 14, 2026
HomeनाशिकNEET Paper Leak Nashik Connection : सामान्य कुटुंब, कारनामे मोठे; खैरनार परिवार...

NEET Paper Leak Nashik Connection : सामान्य कुटुंब, कारनामे मोठे; खैरनार परिवार नॉट रिचेबल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नीट पेपर फुटी प्रकरणाचे (NEET Paper Leak) नाशिक कनेक्शन अधिक गडद झाले आहे. इंदिरानगर भागातून (Indiranagar Area) युनिट दोनने अटक केलेला नांदगावच्या गंगाधरीतील संशयित शुभम मधुकर खैरनार याच्या कुटुंबाचा इतिहास आता समोर आला असून, शुभमचा मोठा भाऊ यापूर्वीच एका गुन्हेगारी प्रकरणात पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

शुभमचा मोठा भाऊ नांदगाव (Nandgaon) येथील हमालवाडा भागात मेडिकल स्टोअर चालवतो. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्याच्यावर बेकायदेशीररीत्या गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. एका बाजूला भाऊ गुन्हेगारी (Criminal) पार्श्वभूमीशी जोडला गेलेला असताना, दुसरीकडे शुभम आता पेपर फुटीच्या आंतरराज्य रॅकेटमध्ये अडकल्याने खैरनार कुटुंबाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

हे देखील वाचा : NEET Paper Leak Nashik Connection : स्पर्धा परीक्षा पेपरफुटीची ‘तीस वर्षांची परंपरा’; नाशिक राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा चर्चेत

शुभमचे वडील वैद्यकीय क्षेत्रातील अल्प ज्ञानावर आधारित छोटा-मोठा व्यवसाय करतात. त्यांच्याच सांगण्यावरून शुभम वैद्यकीय शिक्षण घेत होता, असे समजते. खैरनार कुटुंबाची नांदगाव येथे एक ते दीड एकर शेती असून, वर वर पाहता हे कुटुंब सामान्य बाटते. मात्र, घरातील दोन्ही मुलांचे कारनामे पाहता, या सामान्य कुटुंबाचे (Family) धागेदोरे नेमके कोठे आणि कोणाशी जोडले गेले आहेत, याचा तपास आत्ता सीबीआय करत आहे. शुभमची आई गृहिणी असून त्याचे वडील सध्या कोठे आहेत, याची माहिती मिळू शकलेली नाही.

घराला टाळे

शुभम खैरनार सध्या सीबीआयच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याने नाशिक आणि परिसरात कोणाला पेपर पुस्वले किंवा त्याचे मुख्य सूत्रधार कोण आहेत, याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या कारवाईनंतर नांदगाव येथील त्याचे संपूर्ण कुटुंब सध्या नॉट रिवेबल झाले असून घराला टाळे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हे देखील वाचा : NEET Paper Leak : पेपरफुटीचे टेलिग्राम कनेक्शन; एक मे रोजीच प्रश्नपत्रिका व्हायरल

रडारवर नवे कनेक्शन

शुभमचा भाऊ मेडिकल क्षेत्रात असूनही गुन्हेगारी प्रवृत्तीकडे कसा वळला आणि शुभम या मोठ्या रॅकेटमध्ये कसा अडकला ? वडिलांच्या ओळखीचा यात काही संबंध आहे का? या सर्व बाबींचा शोध आता सुरू आहे. नाशिकच्या इंदिरानगर ते नांदगावच्या हमालवाडा असा हा पेपरफुटीचा प्रवास आता नेमके कोणते मोठे मासे गळाला लावतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : दीड कोटींचा हस्तगत मुद्देमाल फिर्यादींना परत; परिमंडळ...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik अंबड विभाग अंतर्गत (Ambad Division of Zone) येणाऱ्या अंबड पोलीस ठाणे, इंदिरानगर पोलीस ठाणे, सातपुर पोलीस ठाणे, एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे...