Sunday, June 14, 2026
Homeक्राईमNEET Paper Leak : पेपरफुटीचे टेलिग्राम कनेक्शन; एक मे रोजीच प्रश्नपत्रिका व्हायरल

NEET Paper Leak : पेपरफुटीचे टेलिग्राम कनेक्शन; एक मे रोजीच प्रश्नपत्रिका व्हायरल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

देशातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी नीट (एनईईटी) परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यंदा या परीक्षेची (Exam) प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच अर्थात दोन दिवस आधी सोशल मीडियावर, विशेषतः टेलिग्रामवर लिक झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, यामध्ये प्रायव्हेट माफिया नावाच्या चॅनलचा मुख्य सहभाग असल्याचे उघड होत आहे.

- Advertisement -

व्हायरल व्हिडिओनुसार (Viral Video) टेलिग्रामवरील प्रायव्हेट माफिया नावाच्या एका ग्रुपवर १ मे २०२६ रोजीच प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे दावे करण्यात आले. या ग्रुपच्या अॅडमिनने भावी डॉक्टरांना उद्देशून संदेश टाकला आहे. त्यात ‘मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, हाच पेपर परीक्षेला येईल. तो सोडवला तर तुम्हाला मेडिकल कॉलेजची सीट नक्की मिळेल’. हे रॅकेट नियोजनबद्ध पद्धतीने चालवले जात असल्याचे व्हिडिओवरून समोर आले आहे.

दरम्यान, ग्रुपवर नीट लिक्ड केश्नन पेपर २०२६ नावाची ५.७ एमबीची पीडीएफ फाईल (PDF File) शेअर करण्यात आली होती. ही फाईल सुरक्षित ठेवण्यासाठी ९४६६ हा पासवर्ड देण्यात आला होता. हा पेपर ग्रुपच्या बाहेर कोणालाही शेअर करू नका, अन्यथा ग्रुपमधून काढून टाकले जाईल, अशी धमकीही सदस्यांना देण्यात आली. २०२४ मध्ये जे झाले तसेच याही वर्षी होईल, त्यामुळे नियम मोडू नका, असा उल्लेख करत मागील पेपर फुटीचा (Paper Leak) संदर्भही यात देण्यात आला आहे.

पालक, विद्यार्थ्यांमध्ये संताप

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातील २३ लाखांहून अधिक विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जर ३ मे (परीक्षेच्या आधी) हा पेपर टेलिग्रामवर उपलब्ध होता, तर मग राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (एनटीए) गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

व्हिडिओत दडलेले पुरावे

  • व्हिडिओमध्ये संगणकाच्या स्क्रीनवर आणि प्रत्यक्ष कागदावर छापलेली प्रश्नपत्रिका दाखवण्यात आली आहे, त्यावर १२ असे ठळकपणे लिहिलेले आहे.
  • पेपर खरेदी करणाऱ्यांचे आभार मानणारी एक हस्तलिखित चिड्डीही व्हिडिओत दिसते. त्यावर माोफिया अशी स्वाक्षरी असून हा पेपर तुम्हाला २०२६ च्या परीक्षेत यश मिळवून देईल, असा मजकूर आहे.
  • व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिकेतील फिजिक्स विषयाचे प्रश्न जसेच्या तसे दिसत आहेत.

ताज्या बातम्या

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

0
मानूर | वार्ताहर Manur कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या...