अहमदनगर (प्रतिनिधी)
गावठी कट्टा व काडतुस बाळगणार्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. अशोक लक्ष्मण कराळे (वय 48 रा. विसापुर ता. श्रीगोंदा) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुस व एक कार असा एकुण पाच लाख 31 हजार 500 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आगामी सण, उत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अवैध अग्निशस्त्रे व हत्यारांविरूध्द कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात येत आहे. अशोक कराळे हा त्याच्याकडील कार मधुन गावठी कट्टा व जिवंत काडतुस विक्री करण्यासाठी शिर्डी येथुन बेलवंडी (ता. श्रीगोंदा) येथे घेवुन जाणार आहे, अशी माहिती सोमवारी (दि. 26) पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली होती. त्यांनी उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार रवींद्र कर्डिले, रवींद्र घुगांसे, सचिन आडबल, संतोष खैरे, शरद बुधवंत, विजय ठोंबरे, फुरकान शेख, शिवाजी ढाकणे यांना कारवाईचे आदेश दिले.
पुण्यात चाललंय काय? तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने वार, धक्कादायक Video आला समोर
पथकाने लागलीच नगर- मनमाड रस्त्यावर कॉटेज कॉर्नर, सावेडी येथे सापळा लावला. संशयीत कार येताच पोलिसांनी ती कार आडवली. पंचासमक्ष त्यांनी कारमधील व्यक्तीची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव अशोक लक्ष्मण कराळे असे सांगितले. त्याची झडती घेतली असता एक गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुस मिळुन आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत कार, कट्टा व काडतुसे जप्त केली आहेत.
ICC World Cup 2023 : आयसीसी वनडे वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर, भारत-पाकिस्तानचा महामुकाबला ‘या’ दिवशी होणार




