Sunday, November 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमनमाडमध्ये पावसाची हजेरी; आठवडे बाजारात ग्राहकांसह व्यावसायिकांची तारांबळ

मनमाडमध्ये पावसाची हजेरी; आठवडे बाजारात ग्राहकांसह व्यावसायिकांची तारांबळ

- Advertisement -

मनमाड | प्रतिनिधी Manmad

शहरासह परिसरात अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अचानकपणे आलेल्या या पावसाने आठवडे बाजारातील ग्राहकांसह व्यावसायिकांची त्रेधातिरपीट उडवून दिली.

गेल्या तीन दिवसापासून परिसरात ढगाळ वातावरण होते. या ढगाळ वातावरणाची परिणिती रविवारी रिमझिम पावसात झाली. रविवारी येथे आठवडे बाजार असतो त्यात शहरातील नागरिका सोबत पंचक्रोशीतील शेतकरी विक्रीसाठी भाजीपाला,धान्य यासह इतर वस्तू घेऊन येतात तर इतर दुकानदार व व्यासायिक आपापली दुकाने थाटतात.वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची सकाळ पासून मोठी गर्दी होत असते आठवडे बाजारात लाखो रुपयांची उलढाल होत असल्यामुळे त्याचा शहरातील अर्थकारणाला हातभार लागतो.

अचानक आलेल्या पावसामुळे बाजारात आलेले ग्राहकांसह दुकानदारांची एकच तारांबळ उडली. पावसामुळे भाजीपाल्यासह इतर वस्तू भिजल्यामुळे दुकानदारांचे मोठे नुकसान झाले.यंदा सुरुवातीला पडलेला पाऊस वगळता संपूर्ण पावसाळा कोरडा गेला त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पावसाअभावी खरीप हंगाम हातातून गेल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्याचा परिणाम बाजार पेठेवर होत असल्याचे दिसून येत असून दिवाळी जवळ आलेली असतानाही आठवडे बाजारसह बाजार पेठेवर मंदीचे सावट असल्याचे दिसून येत आहे.

ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त तुळशी गावाला शरद पवारांचा मोठा दिलासा; ५० लाखांचा दिला धनादेश

0
माढा : राज्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी गावाला...