Friday, May 3, 2024
Homeनगरराजळे गोळीबार प्रकरण; आणखी एकाच्या मुसक्या आवळल्या

राजळे गोळीबार प्रकरण; आणखी एकाच्या मुसक्या आवळल्या

अहमदनगर (प्रतिनिधी)

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Minister Shankarrao Gadakh) यांचे स्वीय सहायक राहुल राजळे (Rahul Rajale) यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी (Firing case)…

- Advertisement -

आणखी एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (ahmednagar lcb) पुण्यातून (pune) अटक केली. संतोष उत्तम भिंगारदिवे ( रा. घोडेगाव ता. नेवासा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

‘शहनाज गिल’चा किलर लूक, फोटोंवरुन हटणार नाही नजर!

शुक्रवारी रात्री लोहगाव (lohgoan) परिसरात राजळे यांच्यावर गोळीबार करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी विकास राजळे यांच्या फिर्यादीवरून चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (newasa firing news)

पांढरी साडी अन् साधा भोळा अंदाज, पाहा ‘आर्ची’चे खास फोटो

सुरूवातीला आरोपी नितीन शिरसाठ याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.आता भिंगारदिवे याला पुण्यातून अटक केली आहे. बबलू लोंढे व ऋषिकेश शेटे अद्यापही पसार आहेत. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास आता पोलीस उपअधीक्षक मुंढे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

गुलाबाची कळी….! प्राजक्ता माळी गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय झक्कास

- Advertisment -

ताज्या बातम्या