Thursday, May 2, 2024
Homeनगरबोगस वटाणा बियाणांचा सहा लाखांचा साठा जप्त

बोगस वटाणा बियाणांचा सहा लाखांचा साठा जप्त

अहमदनगर | प्रतिनिधी

बोगस वटाणा बियाणे विक्रीसाठी नेणाऱ्या ट्रकवर छापा टाकून ६ लाख रुपयांचा माल जप्त करण्याची मोठी कारवाई कृषी विभाग व पोलिसांच्या पथकाने करून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

- Advertisement -

बोगस वटाणा बियाणे विक्रीसाठी येणार असून कृषी विभाग व पोलिसांच्या पथकाने धडक कारवाई करत ट्रकमध्ये प्रती बॅग 40 किलो, एकूण बॅग संख्या 150 असा 6 लाख-रुपयाचा बनावट वटाणा बियाणे हस्तगत केले आहे. या प्रकरणी पारनेर ठाण्यामध्ये संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेबाबत किरण गुलाबराव गवय यांनी फिर्याद दिली आहे.

बनावट बियाणे संदर्भामध्ये कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. कृषी विभागाच्या पथकाला बोगस वटाणे बियाणे विक्रीस येणार असल्याची माहिती मिळाली होती. यामुळे कृषी विभागाने पारनेरमध्ये सापळा रचून ही कारवाई केली.

बोगस बियाणाचा ट्रक (क्र.युपी 92 टी 8149) हा आंबेडकरचौक पारनेर येथे उभा होता. त्यात एकूण 6 टन वजनाचे बनावट वटाणा बियाणे आहे. ट्रकमध्ये पटेल सिडस कार्पोरेशन जालौन युपी या कंपनीचे 6 टन व्हरायटी एपी 3 लट क्रमांक 21-24-510-16-2 प्रमाणित प्रमाणपत्र क्रमांक 30148 तपासणी दि. 2 मे 2021 टग ( क्रमांक 102175840556) बगचे वजन प्रती बग 40 किलो एकूण बग संख्या 150 असा एकुण 6 लाख रुपयाचा बनावट वटाणा बियाणे मिळून आला आहे. ट्रकवरील चालक तसेच पटेल सिडस कार्पोरेशन जालीन युपी या कंपनीचा मालक यांच्याविरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळीबा नाथु उपडे (कृषी अधिकारी पंचायत समिती पारनेर ता पारनेर) , विलास रावजी गायकवाड (तालुका कृषी अधिकारी पारनेर), जयंत किसनाराव साळवे (तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती पारनेर) ,किरण गणपत पिसाळ ( मंडळ कृषी अधिकारी पारनेर) आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या