Friday, May 3, 2024
Homeनगर'बर्ड फ्ल्यू'च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क

‘बर्ड फ्ल्यू’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क

अहमदनगर | Ahmednagar

करोनाची लाट ओसारत नाही तेच राज्यावर आता बर्ड फ्लूचे संकट कोसळले आहे. मुंबई, ठाणे, परभणी, बीड आणि दापोलीमध्ये बर्ड फ्लूमुळे पक्षांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ‘बर्ड फ्ल्यू’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

- Advertisement -

‘बर्ड फ्ल्यू’च्या प्रतिसाद आणि प्रतिबंधासाठी जिल्ह्यात ७८ पथकांची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. तसेच अद्याप जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूची नोंद झाली नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

‘बर्ड फ्ल्यू’ धोकादायक, राज्यात हायअलर्ट घोषित करण्याची गरज – आरोग्यमंत्री

‘बर्ड फ्ल्यू’च्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच, राज्यात हाय अॅलर्ट घोषित करण्याची गरज आहे, असं मत मांडलं आहे.

“देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या बर्ल्ड फ्ल्यूने थैमान घातलं असून महाराष्ट्रातही त्याचा शिरकाव झाला आहे. परभणी जिल्ह्यात शेकडो कावळे या आजारानं मृत्यूमुखी पडले आहेत. सुरुवातीला पक्षांमध्ये संसर्ग होणाऱ्या या आजाराचा मानवी शरिरातही संसर्ग होतो. या आजाराचा मृत्यू दर हा १० ते १२ टक्के आहे. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाने अलर्ट घोषीत करणं गरजेचं आहे,” असं टोपे यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या